News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज पनवेलमध्ये ...आपला कोकण संध्या वृत्त

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज पनवेलमध्ये ...आपला कोकण संध्या वृत्त

पनवेल :  भारतीय जनता पार्टी,  सांस्कृतिसक सेल, पनवेल शहरतर्फे आज (दि.२६) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या  "मनोरंजन अनलॉक@पनवेल- संगीत नृत्य व नाटकाची मेजवानी" या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहामध्ये नाटकाचा व संगीताचा प्रयोग रंगत आहे. या अनुषंगाने उपाध्ये हे नाट्यरसिकांना तसेच कलाप्रेमींना भेटण्यासाठी पनवेल नगरीत येत आहेत. 
         भाजपा सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे हे देखील सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे.
         या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना तसेच नियोजन हे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून, सांस्कृतिक सेल चे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सह संयोजक गणेश जगताप, तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कंबर कसली आहे. आयोजकांचा कोरोना संदर्भातील सर्व खबरदारी बाळगून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा उद्देश आहे व त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.
       10 महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर प्रथमच रंगमंचावर कलाविष्कार सादर होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची प्रतिक्षा सर्वच पनवेलकर करत आहेत .

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment