राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघ SIR अभियानिसाठी शिवदास कांबळे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती
पनवेल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील २२८ विधानसभा मतदारसंघासाठी विशेष सखोल पुनरिक्षण S.I.R अभियान करता विधानसभा मतदारसंघ निहाय समन्वयकांच्या नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केल्या आहेत.त्यानुसार 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे समन्वय म्हणून सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक,पक्ष संघटनेच्या कार्याचा प्रदीर्घ अनुभवी व अभ्यासू म्हणून याची ओळख आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिवदास कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने अग्रभागी दिसावा म्हणून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असणारे व पक्ष शिस्तीचे तंतोतंत पालन करण्याची हातोटी कार्यकर्ते म्हणून शिवदास कांबळे यांच्या नियुक्तीला महत्व आहे
Post a Comment