News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन ...."पदाजी पांडुरंग मुंबईकर विद्यालयात मानसिक आरोग्य,तणाव व्यवस्थापन आणि भावनिक संतुलनावर विशेष कार्यक्रम"

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन ...."पदाजी पांडुरंग मुंबईकर विद्यालयात मानसिक आरोग्य,तणाव व्यवस्थापन आणि भावनिक संतुलनावर विशेष कार्यक्रम"

उरण : शिक्षकांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि भावनिक आरोग्यालाही महत्त्व देण्याच्या उद्देशाने जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, महाराष्ट्र होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर्स असोसिएशन (MHFDA), पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘NAVDRUSHTI – A New Vision for Holistic Health’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

MHFDA च्या प्रदेशाध्यक्षा डॉ. रुपाली गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिक्षकांचे मानसिक आरोग्य, ताणतणावाचे व्यवस्थापन, भावनिक संतुलन आणि दैनंदिन जीवनातील अडचणींना प्रभावीपणे सामोरे जाण्याच्या व्यावहारिक पद्धती यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. प्रतिमा म्हात्रे यांनी ‘Psychodynamics of Homoeopathy in Physical Illness’ या विषयावर मार्गदर्शन केले. शारीरिक आजार आणि मानसिक-भावनिक स्थिती यांच्यातील परस्परसंबंध तसेच होमिओपॅथिक उपचारपद्धतीचा दृष्टिकोन त्यांनी स्पष्ट केला.

MHFDA पनवेलच्या अध्यक्षा तथा मानसशास्त्रज्ञ डॉ. सोनाली जोशी यांनी ‘Mental Health Awareness and Emotional Well-being’ या विषयावर संवादात्मक सत्र घेतले. शिक्षकांना ताणतणाव,अतिविचार आणि भावनिक दडपण हाताळण्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध व्यावहारिक पद्धतींची माहिती त्यांनी दिली.

डॉ.विशाखा सुवर्णा यांनी घेतलेल्या संवादात्मक हालचालींवर आधारित उपक्रमांमुळे कार्यक्रमात उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. MHFDA पनवेलच्या उपाध्यक्षा डॉ.सोनल शेठ यांनी संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाचे आयोजन MHFDA पनवेलच्या अध्यक्षा डॉ. सोनाली जोशी,उपाध्यक्षा डॉ.सोनल शेठ आणि सचिव डॉ. अशिता नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कोअर कमिटी सदस्य डॉ.अक्षया ठाकूर,डॉ.सुलक्षणा माडे, डॉ. प्रतिमा म्हात्रे,डॉ.प्राजक्ता वायाळ,डॉ. विशाखा सुवर्णा तसेच MHFDA सदस्य डॉ.अश्विनी कोरे यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.


“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. MHFDA पनवेलने ‘नवदृष्टी’च्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. वैद्यकीय ज्ञानाला सामाजिक बांधिलकीची जोड देऊन सुरू असलेले त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.”
श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे
अध्यक्ष
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment