द रॉयल्स – श्रावण व्होग’चा तिसरा हंगाम ७ सप्टेंबरला..श्रावणातील संस्कृती,पारंपरिक कलावैभव,आधुनिक फॅशन आणि मनोरंजनाचा सोहळा ...आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान,रंगनील क्रिएशन आणि इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी,न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गार्गीज् ग्रुपचे आयोजन
पनवेल : श्रावणातील समृद्ध संस्कृती,पारंपरिक कलावैभव, आधुनिक फॅशन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पनवेलकरांना अनुभवता येणार आहे.‘द रॉयल्स – श्रावण व्होग | पनवेल फॅशन वीक – तिसरा हंगाम २०२६’ या भव्य फॅशन सोहळ्याचे आयोजन सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.सायंकाळी ४ वाजल्यापासून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल येथे हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान,रंगनील क्रिएशन आणि इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी,न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गार्गीज् ग्रुपच्या आयोजनातून हा कार्यक्रम साकारण्यात आला आहे.
‘श्रावणातला हा आविष्कार’
ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू
‘श्रावणातला हा आविष्कार’ या संकल्पनेवर आधारित या फॅशन सोहळ्यात लहान मुले, किशोरवयीन, युवती, महिला आणि पुरुष अशा विविध गटांसाठी फॅशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक, पाश्चात्त्य तसेच इंडो-वेस्टर्न अशा विविध शैलींमधून स्पर्धकांना आपली स्वतंत्र ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास सादर करण्याची संधी मिळणार आहे.लहान मुले आणि किशोरवयीन गटासाठी कोणत्याही ठरावीक संकल्पनेची किंवा शैलीची मर्यादा नसून, ‘तुमची स्वतःची शैली’ सादर करण्याची मोकळीक देण्यात आली आहे.
फॅशनसोबत व्यक्तिमत्त्व विकासावरही भर
हा उपक्रम केवळ फॅशन स्पर्धेपुरता मर्यादित नसून आत्मविश्वास वाढवणे, व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, सर्जनशीलतेला वाव देणे आणि प्रत्येकातील दडलेली स्वतंत्र प्रतिभा व्यासपीठावर आणणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्हांसोबतच भविष्यातील विविध क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विजेत्यांसाठी आकर्षक
बक्षिसांची मेजवानी
या सोहळ्यात चंदूकाका सराफ आणि द्वारकादास श्याम कुमार यांच्या सहकार्याने मौल्यवान भेटवस्तू व बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्वरूप सलूनच्या सहकार्याने आकर्षक सौंदर्यसेवा कूपनही विजेत्यांना मिळणार आहेत.ईकेएस ०९ स्टुडिओच्या सहकार्याने विजेत्यांना संगीत अल्बम,लघुपट तसेच विविध सर्जनशील प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याच्या विशेष संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम स्पर्धेपलीकडे जाऊन नव्या प्रतिभावंतांसाठी भविष्यातील संधींचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
प्रेक्षकांसाठीही लकी ड्रॉची रंगत
कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांसाठीही विशेष भाग्यवान कूपन आणि लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे.आकर्षक बक्षिसे आणि विशेष भेटवस्तू जिंकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे.
नव्या प्रतिभांना मिळणार
हक्काचे व्यासपीठ
महिला, मुले, किशोरवयीन, तरुणाई तसेच समाजातील विविध घटकांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील आत्मविश्वासाला बळ देणे, ही या उपक्रमाची व्यापक भूमिका आहे. फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, मॉडेल्स, बालमॉडेल्स आणि नवोदित कलाकारांना विविध संधी उपलब्ध करून देत त्यांच्या कार्यक्षेत्रात नवी ओळख निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पनवेलकरांनी या अनोख्या श्रावणातील फॅशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा आणि संस्कृती, फॅशन व मनोरंजनाचा हा दिमाखदार सोहळा अनुभवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment