News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेत अ,ब,क,ड चार प्रभाग समितीच्या सभापतींची निवडणूक संपन्न ....प्रभाग समिती अ व ड साठी मतदान प्रक्रिया .... प्रभाग समिती क व ब ची सभापती निवड बिनविरोध

पनवेल महानगरपालिकेत अ,ब,क,ड चार प्रभाग समितीच्या सभापतींची निवडणूक संपन्न ....प्रभाग समिती अ व ड साठी मतदान प्रक्रिया .... प्रभाग समिती क व ब ची सभापती निवड बिनविरोध

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग अ,ब क,ड साठी प्रभाग समिती सभापती निवडणूक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल येथे घेण्यात आली.या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे होते.पीठासीन अधिकाऱ्यांसह पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशित सदस्यांमधून नियमानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.

दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांचेकडे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर ही निवड प्रक्रिया घेण्यात आली .

प्रभाग समिती अ ....
प्रभाग समिती अ खारघर मध्ये महापालिका सदस्य रविंद्र भगत व महापालिका सदस्य योगिता फडके यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले होते.यावेळी मतदान प्रक्रिया घेण्यात आली.यामध्ये महापालिका सदस्य रविंद्र भगत यांना 13 मते मिळाली व योगिता फडके यांना 4 मते मिळाली. प्रभाग अ मधून रविंद्र भगत यांना विजयी घोषित करण्यात आले.

 प्रभाग समिती ब व क एकच अर्ज
प्रभाग समिती ब मध्ये महापालिका सदस्य मधू पाटील व प्रभाग क मधून महापालिका सदस्य रविंद्र जोशी यांचा सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने या ठिकाणी बिनविरोध निवड झाली.

प्रभाग समिती ड
तसेच प्रभाग समिती ड मध्ये महापालिका सदस्य अजय बहिरा व महापालिका सदस्य मनिषा म्हात्रे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. यावेळी झालेल्या मतदान प्रकियेत सदस्य अजय बहिरा यांना 19 मते पडली व सदस्य मनिषा म्हात्रे यांना 3 मते मिळाली. प्रभाग समिती ड मधून महापालिका सदस्य अजय बहिरा याना विजयी घोषित करण्यात आले.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम 21 "स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक" यामधील पोटकलम (1) व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती आणि इतर समित्यांच्या सभापती यांची निवडणूक घेणे), नियम 2007 मधील नियम (6) अन्वये पीठासीन अधिकारी किशन जावळे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ,ब,क,ड' सभापती पदी आज दिनांक 11 ऑगस्ट, २०२६ पासून प्रभाग समितींच्या लगतनंतरच्या सरकारी वर्षातील पहिल्या सभेपर्यंतच्या कालावधीसाठी नवनिर्वाचित  चारही प्रभाग समिती सभापतीची  निवड झाल्याचे घोषित केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment