News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्या मंदिरात रेनकोट व छत्री वाटप .... आ.प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्या मंदिरात रेनकोट व छत्री वाटप .... आ.प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक

पनवेल- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.या उपक्रमांतर्गत भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कोळेश्वर विद्यामंदिर (शाळा क्र. ४) येथील विद्यार्थ्यांसाठी रेनकोट आणि शिक्षकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.​यावेळी उपस्थित राहून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट आणि शिक्षकांना छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या उपयोगास पडतील असे सेवाभावी उपक्रम राबवल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहर उपाध्यक्ष केदार भगत यांचे मनापासून कौतुक करून आभार मानले.
आपल्या मनोगतात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, "माझ्या वाढदिवसानिमित्त कोळेश्वर विद्यामंदिरातील विद्यार्थी व शिक्षकांना मोफत रेनकोट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळ्यात विद्यार्थी आणि शिक्षकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. समाजोपयोगी कार्यातून नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे." या सेवाभावी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी श्री. केदार सुरेश भगत यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमित ओझे, रूपेश नागवेकर, प्रभाग १९ चे अध्यक्ष पवन सोनी, युवा नेते प्रतिक बहिरा, मुख्याध्यापक दशरथ म्हात्रे, हरिश्चंद्र भगत, रामा भगत, युवा मोर्चा सरचिटणीस अनिमेश ओझे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment