इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी ममता राजीवन
पनवेल - इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी ममता राजीवन यांची 2026- 2027 सालासाठी निवड झाली असून, नुकताच पदग्रहण समारंभ तथास्तू हॉल, पनवेल येथे पार पडला.
क्लबच्या सेक्रेटरीपदी स्नेहा पवार,व्हाईस प्रेसिडेंट सुनिता आडमुठे,आयपीपी भुमिका परमार,खजिनदार सुरेखा परमार, आयएसओ छाया ठक्कर,एडिटर आकांक्षा अवसरे,सिपीसी हेमा परमार,जॉईट सेक्रेटरी शितल वळंजु तर सल्लागार समितीमध्ये लता शहा,कल्पना कोठारी,साधना धारगळकर, स्नेहल वाडकर,सुरूची ढोंड,दिपाली आडमुठे यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्षा भुमिका परमार यांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्दल सदस्याचे आभार मानले.
Post a Comment