हैदराबाद( तेलंगणा )येथे होणा-या राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी रायगडचे सुभाष पाटील यांची स्पर्धा प्रमुख व प्रशांत घरत यांची पंच म्हणून निवड
पनवेल ( प्रतिनिधी )- भरतीय पोलीस दल आणि हैदराबाद पोलीस खेळ मंत्रालय भारत सरकार व तायकवांडो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित पोलीस गेम्स राष्ट्रीय तायक्वॅन्डो स्पर्धा बालयोगी इनडोअर स्टेडियम हैदराबाद येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रायगडचे सुपुत्र तायकवोंडोचे आंतरराष्ट्रीय पंच व ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट यांची यांची तायकवोंडो खेळात निस्वार्थी पोलीस गेम्स तायकवोंडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणुन निवड झाली आहे तसेच या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रशांत घरतची निवड झाली आहे तसेच रायगडचे सुपुत्र सुभाष पाटील यांची तायक्वांदो खेळात निस्वार्थीपणे पंच प्रशिक्षक म्हणून देशात व परदेशात आतापर्यंत करत आलेल्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेत गेल्या वर्षी काश्मीर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पोलीस स्पर्धा ही सुभाष पाटील यांनी यशस्वीपणे पार पडल्या होत्या व त्यांच्या अनुभवाचा फायदा पोलीस खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांना व्हावा व भविष्यात देशातुन उत्कृष्ट पंच प्रशिक्षक व खेळाडू तयार होतील म्हणून देशातील या खेळाची अधीकृत शिखर संघटना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सुभाष पाटील यांची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पोलीस गेम्स तायकवोंडो स्पर्धा प्रमुखपदी नेमणूक केली आहे
तसेच खेळाडू म्हणून नवी मुंबई पोलीस मयुरी खरात हिची निवड झाली आहे मयुरी खरात गेली १५ ते १७ वर्ष तायक्वोन्डो प्रक्षिक्षण सुभाष पाटील यांच्याकडे घेत आहे
सुभाष पाटील,प्रशांत घरत व मयुरी खरात यांना वरील राष्ट्रीय पोलीस स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल रायगड तायक्वांदो असोसिएसन,तायक्जांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) पदाधिकारी,प्रशिक्षक व आमदार प्रशांत ठाकूर,विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील व मा. सभागृह नेता परेश ठाकछर व महापौर नितीन पाटी यांनी विशेष अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment