News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; कोमल मोहनिश भोईर यांना मानद डॉक्टरेट सन्मान

समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; कोमल मोहनिश भोईर यांना मानद डॉक्टरेट सन्मान

मुंबई  : समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कोमल मोहनिश भोईर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत "व्हिजनरी डॉक्टरेट ऑनर इन सोशल वर्क" हा प्रतिष्ठेचा मानद डॉक्टरेट सन्मान प्रदान करण्यात आला.विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मानवतेची सेवा, समाजाप्रती असलेली निष्ठा आणि लोककल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

कोमल मोहनिश भोईर यांनी अनेक वर्षांपासून गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे, पूरग्रस्तांना मदत, दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शैक्षणिक सहाय्य, महिलांसाठी आरोग्य जनजागृती उपक्रम तसेच वृद्धाश्रमांमध्ये सेवा अशा विविध सामाजिक कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले असून, समाजहितासाठी केलेल्या या सातत्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कोमल मोहनिश भोईर म्हणाल्या, "हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून समाजासाठी अधिक जबाबदारीने आणि निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा माझा प्रयत्न यापुढेही कायम राहील."
त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
"समाजसेवा हीच खरी मानवसेवा" या विचाराने प्रेरित होऊन कोमल मोहनिश भोईर यांचे कार्य भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment