News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.जयश्री पाटील ..... विविध समाजोपयोगी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा अध्यक्षा डॉ.जयश्री पाटील यांचा संकल्प

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.जयश्री पाटील ..... विविध समाजोपयोगी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा अध्यक्षा डॉ.जयश्री पाटील यांचा संकल्प

पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचा सन २०२६–२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीचा पदस्थापना समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्षा रो.डॉ.जयश्री पाटील व सचिव रो.ॲड हितेश रजपूत यांनी पदाची शपथ घेत क्लबच्या नेतृत्वाची सूत्रे स्वीकारली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी प्रांतपाल श्री.नितीन धमाले, आमदार रो.श्री प्रशांत ठाकूर विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव,रोटेरियन्स तसेच सामाजिक,शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपल्या मनोगतात,आरोग्य,पर्यावरण संवर्धन,महिला व बालकल्याण, युवक सक्षमीकरण तसेच विविध समाजोपयोगी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सचिवांनी क्लबच्या आगामी वर्षातील उपक्रमांची माहिती देत सर्व सदस्यांच्या सहकार्याने सेवा प्रकल्प अधिक व्यापक करण्याचा विश्वास व्यक्त केला.समारंभात माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रम उत्साह, मैत्रीभाव आणि 'Service Above Self' या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार सेवाभावाची नवचेतना निर्माण करणारा ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले असून उपस्थितांचे आभार मानून समारंभाची सांगता करण्यात आली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment