News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नागोठणे येथील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी,जेष्ठ नागरीक जीव धोक्यात घालून करीत आहेत रस्ता क्राॅस.....तात्काळ गतिरोधक बसविण्याची नागरीकांची मागणी !

नागोठणे येथील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी,जेष्ठ नागरीक जीव धोक्यात घालून करीत आहेत रस्ता क्राॅस.....तात्काळ गतिरोधक बसविण्याची नागरीकांची मागणी !

पनवेल (प्रतिनिधी) - अनेक वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग राज्यकर्त्यांनी दिलेली पोकळ आश्वासनाची खैरात व निष्पाप नागरीकांचे या महामार्गाने घेतलेले जीव तरीही या महामार्गाचे काम मात्र पूर्ण न झाल्याने अपघाताची मालिका आजही जैसे थे आहे.

पनवेल ते इंदापुर हा 0/84 किलोमीटरचा पहीला टप्पा सुप्रीम इन्फ्रा व महाविर या ठेकेदारांना शासनाने दिला होता परंतु ते हा पहीला टप्पा पूर्ण करू शकले नाही,त्यानंतर अनेक ठेकेदारांनी या महामार्गाचे ठेके घेऊन टप्या टप्याने कसाबसा हा महामार्ग पुढे रेटण्याचे काम सुरू ठेवले परंतु या महामार्गावर अनेक छोटी छोटी गावे दुतर्फा असल्याने सब वे ओव्हर ब्रीज उभारले परंतु या महामार्गावरून रस्ता क्राॅस करण्याकरीता गतिरोधक गावाच्या ठिकाणी उभारण्यास मात्र ठेकेदार आजही विसरल्याने महामार्गाच्या आजुबाजुला असलेल्या गावकरी, कष्टकरी,जेष्ठ नागरीक तसेच पादचारी यांना सब वे अथवा ओव्हर ब्रीजचा पल्ला लांब असल्याने रस्ता क्राॅस करताना जीकरीचे अथवा वेळकाढु पणाचे होत असल्याची अशी खंत विविध ठीकाणचे नागरींकाकडून व्यक्त केली जात आहे.

पनवेल-इंदापूर महामार्गावर नागोठणे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला कोकण एज्युकेशन सोसायटीचे बापुसाहेब देशपांडे विद्या संकुल आहे तर दुसरे आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय आहे तसेच बालवाडी पासुन सायन्स,काॅमर्स, आर्ट काॅलेज आहे,या काॅलेजमध्ये किमान 60 ते 70 शिक्षक वर्ग देखील आहे व विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच उजव्या बाजुला शाळा आहे.शाळेच्या मागील बाजुकडे छोटी छोटी गावे आहेत.आदीवासी वाड्या देखील दोन्ही बाजुला असल्याने नागरीकांची ये जा सातत्याने असते तसेच दुध टाकणारा शेतकरी वर्ग देखील आहे हे बहुतांश आपली दुचाकी घेऊन जीव मुठित घेऊन रस्ता ओलांडत असतात  या ठिकाणी ओव्हर ब्रिज आहे,परंतु शाळा काॅलेज सुटल्यावर शेकडो विद्यार्थी त्याचा उपयोग न करता घाईघाईने  शाॅटकटचा वापर करून रस्ता ओलांडताना दिसत असतात या महामार्गावरून रेतीचे डंपर,जड मोठी वहाने तसेच मालवाहु चारचाकीची वरदळ मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणुन तात्काळ गतीरोधक दोन्ही बाजुला बसविल्यास संभाव्य पुढील अपघात टळू शकतील या बाबत नॅशनल हायवेचे कर्तव्यदक्ष अधिकारी  यांनी त्वरीत सूचना देऊन सदर गंभीर बाबची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी पालक वर्ग जेष्ठ नागरीकांतुन केली जात आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment