कविता फक्त आनंद देण्यासाठीच असावी - सुप्रसिद्ध कवी ए.के.शेख .... पनवेलमध्ये साहित्याचा शब्दवेलतर्फे कवी संमेलन संपन्न
पनवेल - कविता फक्त आनंद देण्यासाठीच असावी असे मत सुप्रसिद्ध कवी ए.के.शेख यांनी श्री भगवती साई संस्थान,श्री साई नारायणबाबा आश्रम,पनवेल आणि लायन्स क्लब ऑफ सरगम पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील साई मंदिरात साहित्याचा शब्दवेल आयोजित निमंत्रित कवी संमेलनात व्यक्त केले.
या कार्यक्रमास साहित्यिक अशोक भांडवलकर,सुधाकर चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिका जोशना राजपूत,भगवती साई संस्थान,श्री साई नारायणबाबा आश्रम,पनवेलचे सेक्रेटरी रामलाल चौधरी तसेच राम थदानी,लायन्स क्लब ऑफ सरगम पनवेलचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा तसेच संजय गोडसे,ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी,ज्येष्ठ कवी गणेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना ए.के.शेख म्हणाले,उत्तम कविता कधी आनंद देते,कधी अंतर्मुख करते,कधी सामाजिक वास्तवावर विचार करायला भाग पाडते तर कधी दुःख,संघर्ष किंवा आशा यांचेही प्रभावी चित्रण करते त्यामुळे कवीने प्रामाणिकपणे आपल्या अनुभवांना आणि भावनांना शब्दरूप द्यावे त्यातून वाचकांपर्यंत भावनिक आणि वैचारिक संवाद पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे.नवोदित कवींना वाचकांशी नाते जोडण्याची जाणीव करून देते.कविता ही आनंदासह संवेदनशीलता,चिंतन आणि समाजभान जागवणारी असावी,असे सांगून गझल आणि कविता कशी असावी याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी साहित्यिक अशोक भांडवलकर,सुधाकर चव्हाण, जोशना राजपूत,भगवती साई संस्थान,श्री साई नारायणबाबा आश्रम,पनवेलचे सेक्रेटरी रामलाल चौधरी यांची भाषणे झाली.
पाऊस,प्रेम,पोवाडा,समाज, पर्यावरण,नातेसंबंध,आई-वडील, निसर्ग आदी विषयांवर कवीनीं आपल्या कविता सादर केल्या. उपस्थित कवींना आयोजकांतर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. नवोदीत कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक आणि संस्थांचे मान्यवरांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय गोडसे यांनी मानले.स्वागत गीत अरुण द. म्हात्रे यांनी गायले.
सध्या वाढत्या प्रदूषण आणि जंगलतोडीमुळे आपल्याला चिमण्या कुठेच दिसत नाहीत. नवीन पिढीला चिमण्या या फक्त पुस्तकामधूनच माहित होतात,या साठी लायन्स पनवेल सरगमतर्फे चिमण्यांच्या संवर्धनासाठी पाहुण्यांना चिमण्यांच्या घरट्यांची भेट म्हणून देण्यात आली.
Post a Comment