जी.संजीवा रेड्डी यांच्याशी दिल्लीत महेंद्रशेठ घरत यांनी अन्यायकारक कामगार कायद्यांवर केली चर्चा!
दिल्ली : कामगार चळवळीचे भीष्माचार्य म्हणून संबोधले जाणारे डॉ.जी.संजीवा रेड्डी यांच्याशी आयटीएफचे (लंडन) एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आणि इंटकचे राष्ट्रीय सचिव, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता. १२) दिल्लीत संवाद साधला.यावेळी आयटीएफचे आशिया-पॅसिफिक विभागाचे नवनियुक्त डेप्युटी प्रादेशिक सेक्रेटरी अब्दुल गणी सारंग,आयटीएफचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर शिवगोपाल मिश्रा उपस्थित होते.या सर्वांनी केंद्र सरकार कामगारांवर लादू पाहत असलेले चार लेबर कोड आणि त्यांचे कामगारांवर होणारे गंभीर परिणाम याविषयी डॉ.जी.संजीवा रेड्डी यांच्याशी चर्चा केली आणि पुढील रणनीती ठरविण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय कामगार संघ काँग्रेसची (इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस) स्थापना १९४७ मध्ये झाली. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ही देशातील सर्वाधिक जुनी कामगार संघटना आहे. सुमारे ३.५० कोटी कामगारांचे नेतृत्व संघटनेकडे आहे. देशातील बलाढ्य ९ भारतीय केंद्रीय कामगार संघटनांच्या कृती समितीचे जी. संजीवा रेड्डी हे अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी निगडित ही संघटना आहे. संघटनेचे सध्याचे अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी हे ९५ वर्षांचे आहेत. त्यांनी आपली हयात कामगारांच्या भल्यासाठी घालवली आहे. भारतीय कामगार चळवलीला त्यांनी खऱ्या अर्थाने दिशा आहे.
आयटीएफचे आशिया-पॅसिफिक विभागाचे डेप्युटी प्रादेशिक सेक्रेटरी अब्दुल गणी सारंग यांची नव्याने निवड झाल्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले. आणि डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
Post a Comment