News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा ..... पनवेलच्या थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार

सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा ..... पनवेलच्या थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार

पनवेल - पनवेल तालुक्यातील उसर्लि बुद्रुक येथे असलेल्या थ्री स्टार राज रिसॉर्ट यांच्यावतीने पनवेल शहर व आजूबाजूच्या गावातील रहिवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे.सर्वसामान्य रहिवाशांना देखील थाटामध्ये विवाह सोहळा साजरा करता यावा या उद्देशाने स्थानिक रहिवाशांसाठी अत्यल्प शुल्कामध्ये रॉयल वेडिंग प्लॅन लाँच करण्यात आला आहे.बजेट फ्रेंडली पॅकेजमुळे कित्येक गरजवंत कुटुंबांचे थाटात लग्न करण्याचे स्वप्न त्यामुळे पूर्ण होणार आहेत. 

याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना राज रिसॉर्टचे संस्थापक तथा मुख्य संचालक, माजी नगरसेवक संतोष उरणकर म्हणाले की अवघ्या ५० हजार रुपयात आम्ही ८०० लोकांची क्षमता असलेले प्रशस्त हिरवेगार मॅरेज लॉन आणि त्यासोबत वधू पक्ष आणि वरपक्ष यांना प्रशस्त वातानुकूलित रूम्स ऑफर करत आहोत.अवघ्या १ लाख रुपयांत स्वागत समारंभासाठी आकर्षक स्टेज सजावट,अप्रतिम एन्ट्री गेट, बुफे सेटअप,३०० खुर्च्या,१५ टेबल, संपूर्ण लॉन परिसराला मिरची लाईट आणि रॉयल हॅलोजन प्रकाशयोजना,डी जे संगीत सिस्टीम,२ कुलर,वेलकम बोर्ड अशा दणकेबाज सुविधा मिळतील.ते पुढे म्हणाले की ताजे व लजीझ भोजन व्यवस्थादेखील आम्ही या पॅकेजमध्ये ऑफर करत आहोत.यामध्ये ग्राहकांच्या पसंतीची दोन ज्यूस, ग्राहकांच्या पसंतीच्या दोन भाज्या,चपाती,पुरी,दाल तडका,पुलाव,जीरा राईस,गुलाबजाम,आईसक्रीम,मिनरल ड्रिंकिंग वॉटर आणि मुखवास असे परिपूर्ण भोजन अवघ्या माणशी ५०० रुपयांमध्ये मिळणार आहे.

वास्तविक सध्या पनवेल ग्रामीण परिसरामध्ये विवाह सोहळा करण्यासाठी एखाद्या शेतामध्ये जेसीबी लावून लेव्हल करावी लागते. या ठिकाणी विवाह सोहळा करण्यासाठी मंडप डेकोरेशन आणि बुफे सेटअप यासाठी खर्च करावा लागतो. इतके सगळे केले तरी धुळीचा त्रास होतो तसेच एप्रिल आणि मे महिन्यात प्रचंड गर्मीचा जाच सहन करावा लागतो. खर्च करून देखील थाटात विवाह सोहळा केल्याचे सुख तिथे कुटुंबांना मिळत नाही.पनवेल शहरात देखील थाटात विवाह सोहळा आयोजित करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे.अशा समस्त कुटुंबीयांसाठी थ्री स्टार राज रिसॉर्ट यांची बजेट फ्रेंडली वेडिंग प्लॅन ही ऑफर खरोखरच वरदान ठरणार आहे.

नुकतेच राज रिसॉर्टला थ्री स्टार दर्जा मिळालेला आहे.या ठिकाणी डेडिकेटेड रेस्टॉरंट ग्राहकांच्या सेवेत रुजू असून प्रशस्त स्विमिंग पूल मुळे इथे एक आरोमॅटीक व्हेकेशन फील येतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाहुणेदेखील राज रिसॉर्टची निवड करत असतात. आशा आलिशान ठिकाणी थाटामध्ये लग्न करायला मिळणे ही खरोखरच पनवेल शहर आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ९८१९३४४१११,९८१९३४४२२२ 
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment