उबाठा युवा सेना जिल्हाप्रमुख पराग शरद मोहिते यांचा आपल्या सहकार्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.महानगरप्रमुख अॅड.प्रथमेश सोमण यांचा पुढाकार!!
पनवेल(वार्ताहर) ः विविध सामाजिक आणि युवक हिताच्या उपक्रमांमधून सक्रिय असलेल्या युवा सेनेच्या पदाधिकार्यांचे सातत्याने होणारे खच्चीकरण आणि निष्क्रिय तसेच पायचाटू लोकांना मिळणारा पाठिंबा या विरोधामध्ये युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते यांनी महानगरपालिका निवडणूक काळातच बंड केले होते.यातच उमेदवारांच्या निवडीतील बाजारीकरणावर त्यांनी बोट ठेवत थेट स्थानिक पक्षनेतृत्वालाच प्रश्न विचारले होते.मात्र वरिष्ठांकडून मिळालेल्या आश्वासनानुसार तक्रारींवर महिनाभर निकाल न मिळाल्याने आज अखेर पराग मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली,युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात तसेच त्यांच्या हस्ते तसेच शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने आणि युवासेना कार्यकारणी सदस्य ओमकार चव्हाण यांच्या सहकार्याने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
रायगड जिल्ह्यामध्ये युवासेनेचे कार्य तसेच संघटन वाढवण्यात पराग मोहिते यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. तसेच वेगवेगळ्या युवक उपक्रमांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा क्षेत्रातील विविध कॉलेजमध्येही युवासेनेचाच बोलबाला तसेच सत्ता राखण्यातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.यावेळी पराग मोहिते यांच्यासह विधानसभा चिटणीस सुशांत सावंत,विधानसभा चिटणीस उरण प्रणव लबडे, महानगर समन्वयक जय कुष्टे,शिव सहकार सेना जिल्हा संघटक संपत सुवर्णा, उपमहानगर अधिकारी विराज साळवी,जितेंद्र सिद्धू, मा.उपतालुका अधिकारी ऋषीकेश सोगे,शाखाप्रमुख अल्केश जाधव,यशवंत कडव शहर अधिकारी आबेश ओंबळे,शहर अधिकारी संदेश पाटील,शहर समन्वयक दुर्गेश शुक्ला,शहर समन्वयक सिद्धेश मोकल, उपशहर अधिकारी आदित्य मेमाणे, वैभव जाधव,शाखा अधिकारी आदिल शेख,समीर अन्सारी,गौरव मोकल, बाबासाहेब गवई,मा.शाखा अधिकारी ऋषीकेश घुले,रजत गोळे, ओमकार ओंबळे आदींसह प्रतिक कर्णे आणि एमजीएम कॉलेजचे कक्ष युनिटचे सगळे पदाधिकारी तसेच अनेक युवासैनिक उपस्थित होते.
फोटो ः पक्षप्रवेश
Post a Comment