News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नगरसेवक रवींद्र जोशी यांचे कामोठ्यातील नागरी सुविधांबाबत पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन

नगरसेवक रवींद्र जोशी यांचे कामोठ्यातील नागरी सुविधांबाबत पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन

पनवेल - : पनवेल महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक रवींद्र जोशी यांनी कामोठ्यातील नागरी सुविधांबाबत पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले.या निवेदनाद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

पनवेल सायन महामार्ग  ते मानसरोवर स्थानकापर्यंत वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे.महानगरपालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे.मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यामध्ये खड्डे पडतात.या खड्ड्यात पाणी साचल्याने  वाहन चालकांना वाहने चालवणे अवघड होते.या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक रवींद्र जोशी यांनी व्यक्त केले  आहे. 

सेक्टर ३६ भूमी सोसायटी समोरील मार्गावर नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते.मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या परिसरात येतात.या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची कमतरता आहे.

त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मधुमेहींचे रुग्ण,ज्येष्ठ नागरिक,महिलांची कुचंबना सुरू आहे.या ठिकाणी महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी करताना के के सिनेमा ते पेट्रोल पंपपर्यंत नादुरुस्त रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.

सेक्टर १७,१८ व १२ येथील वीज वाहिन्या भूमिगत करण्याची आणि सेक्टर १७ व ३६ येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन जोशी यांनी महापौर आणि आयुक्तांना दिले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment