News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मराठी भाषेचे अस्तित्व जपा - लोककवी प्रशांत मोरे ...‌पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा ..... महात्मा फुले महाविद्यालय व कोमसाप नवीन पनवेल शाखा यांच्यात साहित्यिक कार्यक्रमांचा करार

मराठी भाषेचे अस्तित्व जपा - लोककवी प्रशांत मोरे ...‌पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा ..... महात्मा फुले महाविद्यालय व कोमसाप नवीन पनवेल शाखा यांच्यात साहित्यिक कार्यक्रमांचा करार

पनवेल - मराठी भाषा ही आपली मायबोली आहे,मराठी भाषा ही आपली ओळख,संस्कृती आणि परंपरा आहे,त्यामुळे आपण सर्वांनी मराठी भाषेचे अस्तित्व जपा असे आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांनी पनवेल येथे काढले.

जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद,नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले,त्याप्रसंगी प्रशांत मोरे बोलत होते.महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या समारंभास कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,उपप्राचार्य प्रो.डॉ.लक्ष्मण गवळी,प्रा.चंद्रकांत मढवी आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना लोककवी प्रशांत मोरे म्हणाले,मराठी भाषेतील प्रत्येक बोली भाषेत गोडवा आहे.साहित्य आणि कविता माणसाला जगणं शिकवते,बळ देते.साहित्य जगण्यातून येते.साहित्य कागदावर येत तेव्हा मनातलं कळतं.माणसं घडविणे खूप महत्त्वाचे आहे.समाजामध्ये आज वाईट घटना घडत आहेत,हत्यारे माणसाच्या हातात आली आहेत.साहित्य समाज जोडण्याचं काम करीत आहे असे शेवटी त्यांनी सांगून आपल्या कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, साहित्यिक समाज घडवतात, त्यांच्या शब्दात ताकद आहे. त्यांच्या अंतर्मनातून आलेले साहित्य हे समाजाला हसवतात आणि रडवतातही.आपल्या सर्वांचीच असणारी मराठी भाषा आजही लोकप्रिय आहे,तिचे तरुणाईने संवर्धन केले पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी महात्मा फुले महाविद्यालय व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्यात साहित्यिक कार्यक्रमांचा करार करण्यात आला.महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे घेण्यात आलेल्या कविता व चारोळी स्पर्धा यातील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रवीण गायकर यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार डॉ.सोनू लांडे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर,डॉ.प्रफुल्ल वशेणीकर,प्राध्यापिका शरयू नाईक यांनी केले

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment