News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन ६ मार्च रोजी ....

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन ६ मार्च रोजी ....

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या “आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल” येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व निर्णय होणार आहेत.

सभेच्या विषयपत्रिकेनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानूसार स्थायी समितीची रचना करण्यात येणार असून, जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीतून निवडून आलेल्या पालिका सदस्यांपैकी १६ सदस्यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

तसेच,महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानूसार महिला व बालकल्याण समितीची सदस्य संख्या निश्चित करून संबंधित नियमांनुसार सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासोबतच महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ नुसार ७ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचाही विषय सभेपुढे ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांनी दिली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment