News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महापौर नितीन पाटील व उपमहापौर प्रमिला पाटील यांनी स्वीकारला पदभार ....पदभार स्वीकारताच कामास सुरूवात,आढावा बैठकित विविध विषयांवरती चर्चा

महापौर नितीन पाटील व उपमहापौर प्रमिला पाटील यांनी स्वीकारला पदभार ....पदभार स्वीकारताच कामास सुरूवात,आढावा बैठकित विविध विषयांवरती चर्चा

पनवेल,दि.12 : पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील,उपमहापौर प्रमिला पाटील यांनी मुख्यालयातील महापौर व उपमहापौर दालनाचा पदभार स्वीकारला.पदभार स्वीकारताच कामास सुरूवात करून आढावा बैठकित विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली.

महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच आज मालमत्ता कर,पाणीपुरवठा, शिक्षण विभाग,अतिक्रमण विभाग या अनुषंगाने विविध विषयांवरती आढावा बैठक घेतली.

महापालिका क्षेत्रात पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतो आहे. खारघर, कामोठे, ग्रामीण भाग, कळंबोली, अशा सर्वच ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. यावरील उपाय योजनेवरती यावेळी चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने महाराष्ट्र जलप्राधिकरण, सिडको, शिलार प्रकल्प, भविष्यकालीन मागणी, यासर्वांवर यावेळी चर्चा करण्यात आली. 

 महापालिका कामोठे व तळोजा याठिकाणी  नवीन शाळा  बांधणार आहे.याचबरोबर खारघर,कळंबोली,ग्रामीण भाग, नवीन पनवेल अशा नवीन चार शाळा बांधण्याच्या विषयांवर यावेळी चर्चा  झाली. 

अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून आठवडा बाजारांवर जोरदार कारवाई करावी अशा सूचना उपस्थित सदस्यांनी यावेळी  केल्या.अतिक्रमण कर्मचारी वाढवून त्यासाठी वाहने घेऊन कारवाई करावी अशा सूचना यावेळी सदस्यांनी दिल्या. नोडनिहाय बैठका घेऊन यावर कठोर कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment