News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल येथील साईबाबा मंदिरात शिर्डी साईबाबांच्या चरणपादुका भक्तांच्या दर्शनासाठी .... दि.१८ ते २० फेब्रुवारी दरम्यान धार्मिक सोहळ्याचे आयोजन

पनवेल येथील साईबाबा मंदिरात शिर्डी साईबाबांच्या चरणपादुका भक्तांच्या दर्शनासाठी .... दि.१८ ते २० फेब्रुवारी दरम्यान धार्मिक सोहळ्याचे आयोजन

पनवेल - पनवेल,नवी मुंबई परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी असून,येत्या 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पनवेल येथील साईबाबा मंदिरात शिर्डी साईबाबांच्या चरणपादुका भक्तांच्या दर्शनासाठी येणार आहेत.या पार्श्‍वभूमीवर तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याच्या नियोजनासाठी पनवेल शहरातील श्री साईबाबा मंदिर व श्री साई नारायण बाबा आश्रम येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

या सोहळ्यामध्ये बुधवार दि.18 फेब्रुवारी दुपारी 12.30 वाजता शिर्डीहून श्री साईबाबांच्या दर्शन पादुका श्री साई नारायणबाबा आश्रम,श्री भगवती साई संस्थान,पनवेल येथे येणार आहेत.दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत दर्शन व सायंकाळी 5 ते 7.30 वाजेपर्यंत शोभायात्रा त्यानंतर श्रींचे पादुकांचे दर्शन रात्रौ 10 वाजेपर्यंत, गुरूवार दि.19 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत याच ठिकाणी चरण पादुका दर्शन सोहळा, शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत श्रींचे पादुका दर्शन सोहळा व कार्यक्रम,सकाळी 11 वाजात शिर्डीकडे प्रस्थान त्याचप्रमाणे महाप्रसाद अशा या कार्यक्रमाचे आयोजन आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment