News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कळंबोलीत प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ ..... महाविकास आघाडीचे सुदाम गोकुळ पाटील,विद्या मंगल गायकवाड, अॅड.विना आत्माराम पाटील आणि प्रदीप केसरीनाथ ठाकूर उमेदवार ...."माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या भावनेतून निवडणुकीला सामोरे जाणार- सुदाम पाटील

कळंबोलीत प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ ..... महाविकास आघाडीचे सुदाम गोकुळ पाटील,विद्या मंगल गायकवाड, अॅड.विना आत्माराम पाटील आणि प्रदीप केसरीनाथ ठाकूर उमेदवार ...."माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या भावनेतून निवडणुकीला सामोरे जाणार- सुदाम पाटील

पनवेल:  पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोलीमध्ये निवडणुकीची चुरस शिगेला पोहोचली आहे.यंदाची कळंबोलीतील निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे असून,या प्रभागांमधून थेट तीन प्रमुख राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या भागाकडे वेधले गेले आहे.पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील हे तिन्ही दिग्गज नेते थेट मैदानात उतरल्यामुळे ही लढत केवळ प्रभागापुरती मर्यादित न राहता पक्षीय अस्तित्व, संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वाच्या प्रतिष्ठेची थेट परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे कळंबोलीतील या प्रभागांतील निवडणूक पनवेल महापालिकेच्या राजकारणात निर्णायक मानली जात आहे.
 
दरम्यान, प्रभाग क्रमांक ७ मध्ये महाविकास आघाडी कडून प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. सुदाम गोकुळ पाटील, विद्या मंगल गायकवाड, अॅड. विना आत्माराम पाटील आणि प्रदीप केसरीनाथ ठाकूर या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. ३ जानेवारी) सायंकाळी मोठ्या उत्साहात प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते प्रसाद भोईर,उपनेते बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत,जगदीशभाई गायकवाड, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक,पनवेल युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे,आत्माराम पाटील, बुधाजी ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमान मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राम मंदिर, सेक्टर १७, सेक्टर २०,अंबिका स्वीट कॉर्नर, सेक्टर १३, सेक्टर १४, महाराष्ट्र स्कूल, गुरुद्वारा, कारमेल स्कूल, आयडीबीआय बँक परिसर, सिडको कार्यालय तसेच शनि मंदिर कळंबोली या ठिकाणी पदयात्रा व मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या दरम्यान उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


यावेळी बोलताना प्रभाग क्रमांक ७ चे उमेदवार तथा पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी विकासाचे विविध मुद्दे मांडले. वाढीव मालमत्ता कराविरोधात ठाम भूमिका, पनवेल परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे, कासाडी नदी स्वच्छता अभियान, महिला व बाल सुरक्षेला प्राधान्य, शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना, मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा, अवजड वाहनांच्या पार्किंग समस्येचे निराकरण, नशामुक्ती तसेच प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती या मुद्द्यांवर भर देत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.“माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या भावनेतून आपण निवडणुकीला सामोरे जात असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार देण्याचा निर्धार असल्याचेही सुदाम पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment