पत्रकार दिनानिमित्त उद्या पनवेल महानगर प्रेस क्लबतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि लाईफ स्टाईल डिसऑर्डर कॅम्पचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी)- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील 'दर्पण' हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या पत्रकार दिनानिमित्त पनवेल महानगर प्रेस क्लब आणि सुतिकागृह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि लाईफ स्टाईल डिसऑर्डर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर,आ.प्रशांत ठाकूर,आ.विक्रांत पाटील,महेंद्रशेठ घरत,उद्योजक विजय लोखंडे,काशिनाथ पाटील,प्रितम म्हात्रे,ज्येष्ठ पत्रकार संजय मलमे यांची उपस्थिती लाभणार आहे.स्पर्धेच्या आणि धावपळीच्या महानगर प्रेस क्लब पनवेल युगात पत्रकारांचे नेहमीच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. अवेळी आहार, अपुरी झोप,प्रदुषण यामुळे पत्रकारांना विविध आजाराची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पत्रकारांना तज्ञ डॉक्टरांचे विविध आजारांबाबत मार्गदर्शन पनवेल माता-बाल-संगोपन मंडल सुतिका गृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
मिळणार असून मोफत रक्त चाचण्या, हिमोग्लोबिन, ब्लड शुगर लेवल, ब्लड प्रेशर, आवश्यक असल्यास ईसीजी त्याचप्रमाणे मोफत औषधे उपलब्ध असणार आहेत.
तरी मंगळवार दि.६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सदर तपासण्या उपलब्ध असून पनवेलमधील जास्तीत जास्त पत्रकारांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभघ्यावा असे आवाहन पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी केले आहे.
Post a Comment