प्रभागात केलेल्या मोठ्या विकासकामामुळेच आम्ही मोठ्या फरकाने विजयी होऊ ......विरोधक फक्त सोशल मीडियावर - संतोष शेट्टी ... अनुभवी नगरसेवकांचा प्रभाग-पहिल्या महिला महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल
पनवेल - प्रभागात केलेल्या मोठ्या विकासकामामुळेच आम्ही मोठ्या फरकाने विजयी होऊ असा आशावाद पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 16 चे महायुतीचे उमेदवार पहिल्या महिला महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल,संतोष जी.शेट्टी,राजश्री महेंद्र वावेकर,समीर बाळासाहेब ठाकूर यांनी आपल्या प्रचारार्थ रॅलीच्यावेळी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक 16 हा भाजपचा बालेकिल्ला,भाजपची ताकद असलेला व सर्वाधिक मताधिक्य देणारा प्रभाग.या प्रभागात केलेल्या अनेक विकास कामांमुळेच प्रचारादरम्यान उत्तम प्रतिसाद उमेदवारांना मिळत आहे,त्यामुळे याही निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास या उमेदवारांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम माजी महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल यांनी, 2017 ते 2022 या कालावधीत या प्रभागात अनेक विकासाची कामे केली आहेत.सिडकोकडून भूखंडाचे हस्तांतरण,रस्ते दुरुस्ती,ड्रेनेज लाईन,घनकचरा व्यवस्थापन,विविध ठिकाणच्या बगीच्यांमध्ये खेळणी-ओपन जिम,स्वच्छतागृहे,वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी,प्राथमिक आरोग्य केंद्रे,पाण्याचे व्यवस्थापन आदि कामे या प्रभागात आम्ही करू शकलो.या निवडणुकीकरता पक्षाने आम्हाला पुन्हा संधी दिली आहे,ती आम्ही केलेल्या विकास कामांमुळेच.पनवेल महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये अनेक पदांवर या प्रभागातील नगरसेवकांनी कार्य केले असून अनुभवी नगरसेवकांचा हा प्रभाग आहे मतदार आमचे आनंदाने स्वागत करत असल्याचे सांगितले.
संतोष जी.शेट्टी यांनी,प्रभाग 16 हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कुठल्याही निवडणुका झाल्या,त्या निवडणुकीमध्ये या प्रभागामधून भाजपला मताधिक्य मिळवून दिलेले आहे.या प्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण करावे लागले, त्यानंतर 460 कोटीची निविदा काढण्यात आली.विसर्जन तलाव, वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रीडा अकॅडमी त्याचबरोबर कोरोना काळात केलेली मदत,भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव,गणेश विसर्जन तलावा ठिकाणी गणेश भक्तांचे स्वागत,छटपूजा,बगीचे,रस्ते आदी मोठ्या प्रमाणात विकासकामे या प्रभागात केली आहेत. प्रभागातील विरोधक हे फक्त सोशल मीडियावर दिसतात.भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात आम्ही विकासकामे करत असल्याची त्यांनी सांगितले.
राजश्री महेंद्र वावेकर यांनी,प्रचार करताना जनतेचा,मतदारांचा आम्हाला अतिउत्तम प्रतिसाद आहे. विकासकामे केल्यामुळेच मतदार आमचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत.पक्षाने पुन्हा एकदा निवडणुकीसाठी संधी दिल्याने नाही निवडणुकीत आमचा मोठा विजय होईल असे त्यांनी सांगितले.
समीर बाळाशेठ ठाकूर यांनी, प्रभागात आम्ही केलेली कामे बोलतात.विरोधकांनी कुठलीही विकास कामे केलेली नाहीत.केलेल्या विकास कामामुळेच या प्रभागात जनतेला, मतदारांना भाजप हाच पक्ष हवा आहे.
Post a Comment