पनवेल शहर भाजपाचे उपाध्यक्ष केदार भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल - पनवेल शहर भाजपाचे उपाध्यक्ष केदार सुरेश भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर,जिल्हा भाजपा अध्यक्ष अविनाश कोळी,माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,माजी गटनेते परेश ठाकूर,अरुणशेठ भगत,नितीन पाटील,प्रीतम म्हात्रे,जयंत पगडे व सर्व माजी नगरसेवक,नगरसेविका,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत पनवेल शहर भाजपाचे उपाध्यक्ष केदार भगत यांनी केले.
नागरिकांसोबतचा संवाद अधिक जवळचा आणि सुकर व्हावा,यासाठी उचललेले हे पाऊल असून नागरिकांच्या या जनसंपर्क कार्यालयातून समस्या सोडविण्यात येतील असा आशावाद प्रमुख मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
Post a Comment