नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रिपेड टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे नवे भाडेदर जाहीर
रायगड-अलिबाग (जिमाका) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रिपेड टॅक्सी सेवेसाठी नवे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. सुधारित मूलभूत टॅक्सी भाडे दर रु. 20.66 प्रति किलोमीटर गृहीत धरून अंतरानुसार भाडे व प्रोत्साहन (Incentive) टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे.
निश्चित करण्यात आलेल्या दरांनुसार 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह एकूण भाडे रु. 155 आकारले जाणार आहे. 6.1 ते 8 किलोमीटर अंतरासाठी भाडे रु. 207, तर 8.1 ते 10 किलोमीटरसाठी रु.258 इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. 10.1 ते 12 किलोमीटरसाठी रु.310 आणि 12.1 ते 14 किलोमीटर अंतरासाठी 20 टक्के प्रोत्साहनासह रु.347 भाडे आकारले जाणार आहे.
14.1 ते 16 किलोमीटरसाठी रु. 397, 16.1 ते 18 किलोमीटरसाठी रु. 446, तर 18.1 ते 20 किलोमीटरसाठी रु. 496 भाडे निश्चित करण्यात आले आहे. पुढे 20.1 ते 22 किलोमीटरसाठी रु.545 आणि 22.1 ते 24 किलोमीटर अंतरासाठी रु. 595 इतके भाडे राहील.
24.1 ते 26 किलोमीटर अंतरासाठी 15 टक्के प्रोत्साहनासह रु. 618, 26.1 ते 28 किलोमीटरसाठी रु. 665, तर 28.1 ते 30 किलोमीटरसाठी रु. 713 भाडे निश्चित करण्यात आले आहे. 30.1 ते 32 किलोमीटरसाठी रु. 760, 32.1 ते 34 किलोमीटरसाठी रु. 809, 34.1 ते 36 किलोमीटरसाठी रु. 855 आणि 36.1 ते 38 किलोमीटरसाठी रु.902 इतके भाडे राहील. 38.1 ते 40 किलोमीटरसाठी रु. 950, तर 40.1 ते 42 किलोमीटर अंतरासाठी रु. 998 भाडे आकारले जाणार आहे.
42.1 किलोमीटरपेक्षा पुढील अंतरासाठी दर 2 किलोमीटरच्या स्लॅबनुसार भाडे आकारले जाणार असून, आकारणी ही (चार्जेबल अंतर × रु. 20.66) त्यावर लागू प्रोत्साहन टक्केवारीनुसार करण्यात येणार आहे.
प्रिपेड ऑटोरिक्षाचे नवे भाडेदर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रिपेड ऑटोरिक्षा सेवेसाठी नवे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. सुधारित मूलभूत ऑटोरिक्षा भाडे दर रु. 17.14 प्रति किलोमीटर गृहीत धरून अंतरानुसार भाडे व प्रोत्साहन (Incentive) टक्केवारी ठरविण्यात आली आहे.
निश्चित दरांनुसार 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह एकूण भाडे रु.129 आकारले जाणार आहे. 6.1 ते 8 किलोमीटर अंतरासाठी रु. 171, तर 8.1 ते 10 किलोमीटरसाठी रु.214 इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. 10.1 ते 12 किलोमीटरसाठी रु. 257 आणि 12.1 ते 14 किलोमीटर अंतरासाठी 20 टक्के प्रोत्साहनासह रु.288 भाडे आकारले जाणार आहे.
14.1 ते 16 किलोमीटरसाठी रु. 329, 16.1 ते 18 किलोमीटरसाठी रु. 370, तर 18.1 ते 20 किलोमीटरसाठी रु. 411 भाडे निश्चित करण्यात आले आहे. 20.1 ते 22 किलोमीटरसाठी रु. 452 आणि 22.1 ते 24 किलोमीटर अंतरासाठी रु.493 इतके भाडे राहील.
24.1 ते 26 किलोमीटर अंतरासाठी 15 टक्के प्रोत्साहनासह रु. 512, 26.1 ते 28 किलोमीटरसाठी रु. 552, तर 28.1 ते 30 किलोमीटरसाठी रु.591 भाडे निश्चित करण्यात आले आहे. 30.1 ते 32 किलोमीटरसाठी रु.631, 32.1 ते 34 किलोमीटरसाठी रु.670, 34.1 ते 36 किलोमीटरसाठी रु.710 आणि 36.1 ते 38 किलोमीटरसाठी रु. 749 इतके भाडे आकारले जाणार आहे. 38.1 ते 40 किलोमीटरसाठी रु. 788, तर 40.1 ते 42 किलोमीटर अंतरासाठी रु. 828 भाडे निश्चित करण्यात आले आहे.
42.1 किलोमीटरपेक्षा पुढील अंतरासाठी दर 2 किलोमीटरच्या स्लॅबनुसार भाडे आकारले जाणार असून, आकारणी ही (चार्जेबल अंतर × रु. 17.14) त्यावर लागू प्रोत्साहन टक्केवारीनुसार करण्यात येणार आहे.
शासन धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवाशी वाहतूक होणाऱ्या विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक इत्यादी ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षा व टॅक्सी थांबे असणे गरजेचे आहे. या नव्या भाडेदरांमुळे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पारदर्शक आणि निश्चित दरांचा लाभ मिळणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी सांगितले आहे.
Post a Comment