फेसबुक मैत्री ........ तब्बल ५६ लाख २७ हजाराला गंडा
पनवेल - : फेसबुकद्वारे एका अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे तळोजा येथील एका ३७ वर्षीय पर्यावरणविषयक सल्लागाराला चांगलेच महागात पडले.या सल्लागाराने ज्या महिलेसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली,त्या महिलेने या सल्लागाराला विश्वासात घेऊन त्याला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून त्याच्याकडून तब्बल ५६ लाख २७ हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे.
सायबर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेसह या प्रकरणात सहभागी इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.ऑगस्ट महिन्यामध्ये आरोही मिश्रा नावाच्या महिलेने फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले.सुरुवातीला वेबसाईटवर बनावट नफा दाखवून त्याचा विश्वास जिंकला.त्यानंतर एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समावेश करून रमेश शर्माच्या द्वारे ट्रेडिंग सुरू ठेवण्यास सांगितले.विविध खात्यांवर तब्बल ५६ लाख २७ हजार रुपये भरल्यानंतर वेबसाईटवर त्याच्या नावावर १ कोटी १७ लाखांचा नफा दाखवला.या सल्लागाराला संशय आल्यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
Post a Comment