Jsw च्या नव्या प्रकल्पाला आणि जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा .... परंतु रायगडच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे ....जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांची पत्रकार परिषदेत माहिती
पेण -औद्योगिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील jsw कंपनीच्या नव्याने होत असलेल्या फेज थ्री प्रकल्पा विषयी २२ ऑगस्ट रोजी जनसुनावणी होत असल्याने या जन सुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा दर्शवत असल्याचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले.
परंतु प्रकल्प होत असताना तो प्रदूषण विरहित असा असावा तसेच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र यांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे नाहीतर पाठींबा देणारी शिवसेना भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा ही त्यांनी दिला.
तसेच पुढे बोलताना,हा प्लांट तयार झाल्यानंतर तिथे जो मोठ्या प्रमाणे रोजगार निर्माण होणार आहे आणि तो रोजगार निर्माण झाल्यानंतर नोकर भरती कंपनी करणार आहे ती नोकर भरतीत स्थानकांची नोकर भरती झाली पाहिजे.भरती करताना कंपनीच्या १५ किलोमीटरच्या आत मध्ये असणाऱ्या तरुणांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि नंतर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना ही रोजगार मिळाला पाहिजे.परप्रांतीयांची भरती झाल्यास ती थांबवण्याचा प्रयत्न केलेला जाईल आणि स्थानिकांची रोजगार नोकरी व्हावी यासाठी आमचा आग्रह असेल आहे.
जन सुनावणीच्या अगोदर मॅनेजमेंट बरोबर चर्चा केल्यानंतर जो काही लोकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इथे कोक प्लांट येत आहे आणि त्यामुळे प्रदूषण होणार आहे परंतु तिथे गॅसवर चालणारा प्लांट होत आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेल आहे.कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नसणारा हा प्लांट आहे आणि त्यासाठी जनसुनावणीला पाठिंबा द्यायला पाहिजे.
हा प्लांट झाला तर लवकरात लवकर इथे लोकांना तरुणांना युवा पिढीला काम धंदा मिळणार आहे त्यासाठी आम्ही कंपनी बरोबर असून स्थानिकांच्या हक्कसाठी कंपनीला पाठिंबा दिला असल्याचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले.यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी,युवा सेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे,पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे,उत्तमशेठ पाटील,जीवन पाटील,संकेत पाटील आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment