मालमत्ता कर माफीसाठी महाविकास आघाडीचा पनवेल महानगरपालिकेवर बुधवारी पोल- खोल धडक मोर्चा
पनवेल- मालमत्ता कर माफीसाठी महाविकास आघाडीतर्फे पनवेल महानगरपालिकेवर बुधवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पनवेल महानगरपालिका कार्यालय असा पोल-खोल धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
अनेक मागण्यांसाठी हा महाविकास आघाडीचा मोर्चा असून त्यामध्ये, अवास्तव करासहित शास्तीसह वाढीव रक्कम भरायला लागत आहे असं का?,पाच वर्ष कर वाढ न करण्याचा वायदा केलेला असताना सत्य परिस्थिती करमाफी नाहीच उलट दंड,व्याज ही वसुली असे का?शास्तीसह मालमत्ता कर भरल्यास कायमस्वरूपी मालमत्ता कराच्या बोजाला सामोरे जावे लागणार असे का?,पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ड वर्ग असताना अ वर्ग असलेल्या मुंबई व ठाणे सारख्या महानगरपालिकेसारखा कर दर का?, मुंबई व ठाणे महानगरपालिकेसारख्या सोयी सुविधा नाही मग मालमत्ता कर एवढा का? अशा अनेक प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Post a Comment