नवी मुंबई,पनवेल परिसरातील विकासकांकडून नागरिकांची सुरू असलेली फसवणूक ...महाराष्ट्र बांधकाम उद्योगसेनेचे अध्यक्ष प्रशांत अनगुडे यांचे नगरविकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांना निवेदन
मुंबई - नवी मुंबई,पनवेल परिसरातील विकासकांकडून नागरिकांची सुरू असलेली फसवणूक व संबंधित प्रलंबित तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांची भेट घेण्यात आली.
या बैठकीत नागरिकांच्या समस्या व विकासकांकडून होणाऱ्या अन्याय्य व फसवणुकीच्या प्रकारांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
या सकारात्मक चर्चेनंतर,महाराष्ट्र बांधकाम उद्योगसेना अध्यक्ष श्री. प्रशांत अनगुडे यांनी आज आझाद मैदानावर निश्चित केलेले आत्मदहनाचे आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Post a Comment