नवी मुंबई मेट्रोच्या सकाळी व रात्रीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करा - माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांची मागणी
पनवेल - नवी मुंबई मेट्रोच्या सकाळी व रात्रीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करा अशी माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडको आणि मेट्रो यांच्याकडे मागणी केली आहे.
भाजपा माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील तसेच भाजपा खारघर मंडल उपाध्यक्ष किरण पाटील यांच्याकडे,मेट्रो प्रवाशांनी केलेल्या विनंतीनुसार सिडकोचे मुख्य अभियंता श्री हरताळकर तसेच मेट्रोचे अधीक्षक अभियंता ओंबासे यांची भेट घेत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळी मेट्रोची पहिली ट्रेन पेंधर या स्टेशन वरून पाच वाजता सुरू करण्यासाठी तसेच बेलापूर येथून रात्री बारा वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे तसेच चर्चेद्वारे मागणी केली.मागील वर्षी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर मेट्रोची वेळ वाढवण्यात आली होती. त्यानंतर मेट्रोची ट्रेन रात्री अकरा (११) पर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना देखील मेट्रो सेवेचा लाभ मिळत होता. परंतु आता प्रशासनाने परत मेट्रो ट्रेनच्या वेळेत कपात केल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आलेले आहे व त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आर्थिक कोंडी होत आहे.
सद्यस्थितीला बेलापूर वरून शेवटची मेट्रो ट्रेन ही रात्री दहा (१०) वाजता व पेंधर येथून ही त्याच वेळेस आहे.मुंबई व इतर उपनगरातून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना यामुळे खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तळोजा तसेच पेंधर या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना खाजगी वाहतुकीमुळे खिशाला आर्थिक भूदंड पडतो तसेच वाहतूक कोंडीमुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेने घरी अथवा कार्यालयात पोहचण्यास विलंब होतो.नवी मुंबई मेट्रोने प्रवाशांची मागणी विचारात घेता बेलापूर वरून पेंधरसाठी जाणारी शेवटची मेट्रो ट्रेन ही रात्री बारा (१२) वाजेची असावी तसेच पेंधर वरून बेलापूरला जाण्यासाठी शेवटची ट्रेन ही देखील रात्री ११ वाजेपर्यंत असावी अशी प्रवाशांची मागणी आहे. सकाळी पेधंर या ठिकाणावरून पाच वाजता मेट्रोची ट्रेन सुरू करण्यासाठी प्रवाशांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्याकडे मागणी केली होती.सकाळी बहुसंख्य प्रवाशांना मुंबई तसेच मुंबई उपनगरात जाण्यासाठी लवकर ट्रेनची सुविधा उपलब्ध व्हावी कारण त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी ते सोयीचे होईल. सकाळी पाच वाजता कुठल्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.खाजगी वाहतूक व्यावसायिक ही प्रवाशांची लूट करतात तसेच प्रवाशांना आर्थिक भूदंड देखील सोसावा लागतो. त्यामुळे प्रवाशांचा विचार करता सकाळी पाच वाजता मेट्रो ट्रेनची सुविधा सुरू करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली याबाबतीत मुख्य अभियंता यांनी उपस्थित मेट्रोचे अधीक्षक अभियंता श्री ओंबासे यांना एक आठवड्यात सदर मार्गावर प्रवासी संख्या बाबत पाहणी करण्यास सांगून लवकरच प्रवाशांच्या मागणीचा विचार करून व दिलेल्या निवेदनानुसार मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येईल असे आश्वासित केले.सदर निवेदन देतेवेळी मेट्रोने प्रवास करणारे विद्यार्थी सिद्धेश जाधव,साहिल शिंदे,सोनू मंडल व नैतिक हे देखील उपस्थित होते.
Post a Comment