News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाची ८ दिवसात २९ कोटीं ५६ लाखाची वसुली

पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाची ८ दिवसात २९ कोटीं ५६ लाखाची वसुली

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 18 जुलै रोजी अभय योजना जाहिर केली असून ,गेल्या आठ दिवसात 29 कोटीं 56 लाखाची वसुली केली आहे.आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखून मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबवत रोज सुमारे 4 कोटी महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.

दरम्यान चारही प्रभागामध्ये तसेच पालिका मुख्यालयात नागरिकांच्या मालमत्ताकराविषयीच्या सर्व तक्रारी सोडविण्यावरती भर दिला जात आहे तसेच नागरिकांच्या मालमत्ताकर बिलामधील दुरूस्ती मालमत्ता कर विभाग तात्काळ करून देत आहेत. यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार देखील महापालिकेची कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या बिलाबाबतच्या शंकेचे निरसन करून  आपला मालमत्ता कर भरून पनवेलच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

आयुक्त श्री.चितळे यांच्या सुचनेनूसार मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचे चार महत्वाचे टप्पे आहेत. यामध्ये प्रामुख्याने 18 जुलै ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 90 टक्के सूट मिळणार आहे तसेच 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालाधीत संपुर्ण  मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 75 टक्के सूट मिळणार तसेच या पुढील काळात म्हणजे 1 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर कालावधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 50 टक्के सूट मिळेल आणि 11 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालाधीत संपूर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास असलेल्या शास्तीमध्ये 25 टक्के सूट मिळणार आहे. ही अभय योजना केवळ एकवेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून जाहीर करण्यात आली आहे. 

ऑनलाईन भरल्यास 2टक्के सलवत ...
पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईट, PMC TAX APP अथवा पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांनी  मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यास त्यांना 2 टक्के सवलत मिळेल तसेच  चालू वर्षाचा म्हणजे 2025-26 चा कर 31 जुलैपर्यंत भरल्यास त्यांना या करामध्ये 5 टक्के सूट मिळेल, तरी नागरिकांनी लवकरात लवकर कर भरणा करून याचा लाभ घ्यावा असे मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे यांनी आवाहन केले आहे. 


ही अभय योजना 24x7 सुरू असून यासाठी महापालिकेने नवीन  मालमत्ता कर संकलन केंद्रे सुरू केली आहेत. 
1. मालमत्ता कर संकलन केंद्र – प्राईड सोसायटी सेक्टर 7, खारघर
2. महा ई सेवा केंद्र – गंगा टॉवर, सेक्ट र 21 कामोठे
3. महा ई सेवा केंद्र – ऍलियश बिल्डींग से17 प्लॉट नं84 मोठा खांदा नवीन पनवेल
4. सर्व  5 प्रभाग कार्यालये (नावडे उपविभागासहित)
5. मुख्यालय पनवेल
तरी आत्ता आणि एकदाच असलेल्या अभय योजनांचा लाभ संबधित नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment