पनवेल तालुका प्रेस क्लबच्यावतीने वृक्षारोपण ...आमदार प्रशांत ठाकूर,आयुक्त मंगेश चितळे यांची उपस्थिती ..... पनवेल तालुका प्रेस क्लबच्या उपक्रमाच कौतुक
पनवेल (वार्ताहर) ः वाढणारं शहरीकरण आणि होणारं प्रदूषण याला रोखण्यासाठी वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून नुकतेच लोकनेते दि.बा.पाटील विद्यालय,पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त आणि आमदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.त्याचबरोबर अशाच प्रकारचे उपक्रम पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून सातत्याने पार पाडावे असे मत देखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त आणि आमदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.त्याचबरोबर अशाच प्रकारचे उपक्रम पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून सातत्याने पार पाडावे असे मत देखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये सव्वा लाख वृक्षारोपण आणि वृक्ष लागवड करण्याचं ध्येय पनवेल महापालिकेने घेतलं असून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणार असून खारघरची टेकडी देखील हिरवीगार करणार असल्यास ध्येय महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी बोलून दाखवलं. त्याचबरोबर पनवेल तालुका प्रेस क्लबच्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुकही केलं.विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व कळावं त्याकरिता "एक पेड़ मां के नाम" असा उपक्रम देखील शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येतो त्यामुळे हे वृक्षारोपण शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आलं असल्याचं पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी सांगितलं.
या कार्यक्रमासाठी पनवेल महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, सहाय्य्क आयुक्त डॉ.रुपाली माने, शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे,खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष भाई ओव्हाळ,जिल्हा कार्यकर्णी सदस्य रवींद्र मोरे,पनवेल तालुका प्रेस क्लब सचिव दत्तात्रय कुलकर्णी,सहसचिव स्वप्निल दुधारे,खजिनदार राकेश पितळे, सल्लागार गणेश कोळी, संजय कदम,सुमंत नलावाडे, सदस्य राजेंद्र पाटील, वर्षा कुलकर्णी, प्रतिक वेदपाठक, लालचंद यादव ,गणेश घोलप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment