पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अवैध्य पान टपऱ्यांविरोधात विरोधात युवासेना आक्रमक....अनाधिकृत पान टपऱ्या तातडीने उचलण्याची तंबी दिलेली असतानाही टाळाटाळ का?
अनाधिकृत पान टपऱ्या तातडीने उचलण्याची तंबी दिलेली असतानाही टाळाटाळ का? असा सवाल ही युवासेना कार्यकर्त्यांनी पनवेल महानगरपालिकेला केला आहे
गेले अनेक दिवस सातत्याने युवासेनेचा महापालिका क्षेत्रातील अवैध्य पान टपऱ्या हटवण्याच्या मुद्द्यावर महापालिकेशी पत्रव्यवहार तसेच आयुक्त,उपआयुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू आहेत.मात्र त्यानंतरही काही ठराविक अधिकाऱ्यांच्या टपरी मालकांशी असलेल्या लागेबंधांमुळे पनवेल महानगरपालिकेतील काही ठराविक अनाधिकृत पानटपरी हटवल्या गेल्या नाहीत.
आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी उपआयुक्त श्री.रविकिरण घोडके यांना फोनवर स्पष्ट आदेश देऊन सुद्धा घोडके यांच्याकडून युवासेनेला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिला जात नसल्याने आज युवासेना जिल्हा अधिकारी श्री.पराग मोहिते,युवासेना महानगर समन्वयक श्री.जय कुष्टे आणि युवासेना उपशहर अधिकारी श्री.दुर्गेश शुक्ला यांनी उपआयुक्त श्री.रविकिरण घोडके यांना चांगलेच धारेवर धरत शिवसेना स्टाईल दाखवली.महापालिका आयुक्त यांनी घोडकेना युवासेनेला २ दिवसात केलेल्या कारवाईचा अहवाल देणे आणि बाकी अनाधिकृत पान टपऱ्या तातडीने उचलण्याची तंबी दिलेली असतानाही घोडकेंची ही टाळाटाळ नेमकी कोणत्या उद्देशाने आहे? हा प्रश्न आज युवासेनेने विचारला..
यावर उपआयुक्त श्री.रविकिरण घोडके यांनी आजच्या आजच युवासेनेला अहवाल देण्याचे मान्य केले आणि त्याचसोबत सर्व सहआयुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांकडून तातडीने कारवाई करण्याचे मान्य केले आहे.
आता युवासेना सदर अहवालाची वाट पाहत आहेच मात्र आमची जनतेलाही विनंती आहे की आपणही आपल्या प्रभागात/विभागात/सोसायटीत कोणतीही अनाधिकृत पान टपरी आढळल्यास त्वरित युवासेनेच्या निदर्शनास आणावी. युवासेना त्यावर महापालिकेकडून तात्काळ कारवाई करून घेईल. यासाठी आम्ही आपल्याला लवकरच एक सहकार्य क्रमांक देऊ ज्यावर आपल्याला दूरध्वनी तसेच व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून संपर्क साधता येईल.
Post a Comment