News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद ....भाजपा व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पनवेलमध्ये विजयोत्सव

महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद ....भाजपा व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पनवेलमध्ये विजयोत्सव

पनवेल -  महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आज पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि श्री प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थांच्या माध्यमातून विजय उत्सव साजरा करण्यात आला.

राजगड –(छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानी किल्ला), तोरणा किल्ला – (शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला) रायगड – (मराठा साम्राज्याची राजधानी आणि शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक स्थळ) प्रतापगड (अफझल खानवधामुळे प्रसिद्ध) सिंधुदुर्ग (समुद्रात बांधलेला सागरी किल्ला) राजापूर किल्ला लोहगड (मावळ परिसरातील महत्त्वाचा किल्ला)विसापूर किल्ला (लोहगडाच्या शेजारी, डोंगराच्या टोकावर वसलेला) साल्हेर किल्ला (उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला)मालवण किल्ला (सिंधुदुर्ग परिसरातील) पन्हाळा किल्ला (कोल्हापूरजवळचा भव्य किल्ला) वज्रगड (रुद्रमाळ) – सिंहगडाजवळील दुर्ग हे किल्ले जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून घोषित झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगभर पोहोचेल.यामुळे पर्यटनवाढ आणि रोजगार वाढण्यास मदत होणार आहे.देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. स्थानिक युवकांसाठी मार्गदर्शक,वाहतूक, हॉटेल्स आणि हस्तकला व्यवसायात रोजगाराच्या संधी वाढतील.मोठ्या प्रमाणात  युनेस्को आणि भारत सरकारकडून किल्ल्यांच्या देखभालीसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने केले जाईल.इतिहास अभ्यासक,पुरातत्त्ववेत्ता आणि संशोधकांना या गड-किल्ल्यांवर आधारित अभ्यास करण्याची संधी मिळेल.शिवकालीन स्थापत्य,युद्धतंत्र आणि राज्यकारभार यांचा अभ्यास वाढेल.स्थानिक जनतेमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान आणि जागरूकता वाढणार आहे.विद्यार्थ्यांसाठी इतिहास शिकण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी. किल्ल्यांच्या परिसरात पायाभूत सुविधा (रस्ते, पाणी, स्वच्छता, माहिती केंद्रे इ.) सुधारतात.ग्रामीण पर्यटनाला चालना मिळते,ज्यामुळे त्या भागाचा सर्वांगीण विकास होतो.
या विजय उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून नागरिकांमध्ये पेढे वाटण्यात आले.पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री जे.एम.म्हात्रे,मा.म्हाडा अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील,भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोळी, नगरसेवक श्री.गणेश कडू, श्री गणेश पाटील,श्री रवींद्र भगत, श्री.नितीन पाटील, श्री.सुनील बहिरा, श्री मनोहर म्हात्रे, नगरसेविका सौ.सुरेखा मोहोकर,सौ. सारिका भगत, सौ.अरुणा दाभणे,सौ.दर्शना भोईर, रुचिता लोंढे ,पनवेल शहर मंडल अध्यक्ष श्री.सुमित झुंजारराव, श्री.जगदीश पवार श्री.राजू पाटील,मा.सरपंच श्री.रामेश्वर आंग्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी  मोठ्या संख्येने उपस्थित होते

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे  किल्ले हे महाराजांच्या लष्करी डावपेच, सामरिक कौशल्य आणि राजकीय दृष्टीकोन यांचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. यांचा युनेस्को यादीत समावेश झाल्यामुळे  जागतिक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अधिक ठळकपणे अधोरेखित होईल. हा दिवस माझ्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी उत्सव आहे.
प्रितम जनार्दन म्हात्रे 
अध्यक्ष–जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था 
मा.विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment