श्री अंबिका योग कुटिरतर्फे नवी मुंबई,पनवेल भागातील १६ ठिकाणी योग दिनाचे आयोजन
पनवेल- श्री अंबिका योग कुटिर ठाणे (पनवेल शाखा) यांच्यावतीने नवी मुंबई,पनवेल भागातील १६ वेगवेगळ्या ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.२१ जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो.निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी योग अतिशय आवश्यक आहे.दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. योग दिनाचे औचित्य साधून श्री अंबिका योग कुटिरतर्फे योग दिन साजरा केला जाणार आहे.
यामध्ये तुर्भे - फॅक्टरी, रसायनी - फॅक्टरी, चावणे - फॅक्टरी, बेलापूर - आयटीआय,फडके हायस्कूल- नवीन पनवेल,नेरे स्कूल- विहिघर, नरेश स्टील- तळोजा,आर्मी स्कूल- चिखले, आजीवली - आजीवली स्कूल, टर्फईट - एच ओ सी कॉलनी- पनवेल, महाराष्ट्र क्रीडा संकुल- पनवेल, भारत बँक - पनवेल, नारायण बाबा साई मंदिर - पनवेल, रोटरी क्लब- कळंबोली, खेरवाडी आदिवासी पाडा -पनवेल, पिरामल फार्मा लि.- तुर्भे, पावने एमआईडीसी या ठिकाणी योग दिन साजरा केला जाणार आहे.या कार्यक्रमासाठी सौ.भावना कुलकर्णी,राजन फाटक,सौ.नमिता म्हात्रे, सौ.माधुरी म्हात्रे,कु.सौभाग्या पंडित,सौ.संगीता सरदार,नाना कांडपिळे, सौ.गीता पवार, सौ. नमिता म्हात्रे,व्ही.एस.शिंदे,सौ.रेखा पटेल,सौ.सुजाता माने यांनी विशेष मेहनत घेतली आहे.अधिक माहितीसाठी मनोज कोलगे फोन: 9930347894 यांच्याशी संपर्क साधावा.
Post a Comment