News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने पनवेलच्या विविध प्रभागात स्वच्छता मोहीम

शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने पनवेलच्या विविध प्रभागात स्वच्छता मोहीम

पनवेल  (संजय कदम) : पनवेलकरांच्या निरोगी आयुष्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी सरसावल्या असून महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध प्रभागात स्वच्छता मोहीम उपक्रम राबविला जात आहे. 

त्यानुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर संघटिका अर्चना अनिलकुमार कुळकर्णी यांना प्रभाग १९ मधील नागरिक,डॉक्टर यांच्या ड्रेनेजसंदर्भात तक्रारी येत होत्या.स्वा.सावरकर रस्ता,महात्मा फुले  रस्ता,बुधकर दवाखाना,जोशी डॉक्टर (डोळयांचे हॉस्पिटल) व पुढे तुळजाभवानी पतपेढी,पुढे जुने पोस्ट अॉफीस येथील गटारे वहात होती.कचरा भरपूर प्रमाणात होता.याबाबत पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर यांच्याशी संपर्क साधून त्यांना नागरी समस्या संदर्भात माहिती दिली. लगेचच त्यांनी आपली स्वच्छता टीम पाठवून गटारे साफ केली.या कामी स्वच्छता निरीक्षक भोईर,रीना बेहरे,स्वच्छता टीम यांनी सहकार्य केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment