कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ,पनवेलतर्फे रक्तदान शिबिर संपन्न : १५१ बाटल्या रक्त संकलित
पनवेल (संजय कदम):- कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने आणि ओरायन मॉलच्या सहकार्याने शनिवारी पनवेल शहरातील ओरायन मॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १५१ रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या.या शिबिराचे उदघाटन पनवेल सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले.याशिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाचे अध्यक्ष मंगेश परुळेकर यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी उपाध्यक्षा नंदा विभाकर नाईक,डॉक्टर शिवदास कांबळे,गंगाराम सामंत,यतीन ठाकूर, शाम वालावलकर,विनायक तिरोडकर,हरेष परुळेकर, चंद्रकांत तेंडोलकर,लक्ष्मण अवसरे,आकांक्षा अवसरे,माधुरी प्रभू,निशा वालावलकर,गीता प्रभू,नयन पाटकर,भारती खानोलकर,चेतना वालावलकर,मैंथिली सामंत,अपूर्वा प्रभू, अभय प्रभू,चिन्मय नाईक,पूर्णिमा तिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शमंडळाच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून,गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता वाढण्यास मदत झाली आहे. या शिबिराच्या आयोजनात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मंडळाने आभार मानले.
Post a Comment