News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या ५ विद्यार्थ्यांची सुटका

खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या ५ विद्यार्थ्यांची सुटका

पनवेल दि.२६(वार्ताहर): खारघरमधील पांडवकडा धबधब्याच्या ५ जण अडकल्याची घटना सोमवारी घडली होती.सुदैवाने या पाचही जणांना वाचवण्यात यश आले आहे.   
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर वर्षांसाहलीसाठी जाण्याला बंदी असतानाही मुंबई येथील ५ शालेय विद्यार्थी  धबधब्याच्या माथ्यावर पोहोचले होते.मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने, हे लोक खाली उतरू शकले नाहीत व तिथेत अडकले. राहिले होते. याची माहिती अग्निशमन दलाच्या पथकाला मिळताच तातडीने ते घटना स्थळी पोहचले व रेस्क्यू कडून पाचही विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे खाली आणले. हे पाचही जण मुंबईतील सायन कोळीवाडा, आंबेडकर चाळ येथील रहिवासी आहेत. दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. असे असले तरीही ही घटना गांभीर्याने घेऊन खारघर पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत तसेच वर्षा सहलीसाठी कोणीही या ठिकाणी येऊन नये असे आवाहन केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment