News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे मुरबा गणेशभक्तांसाठी पॅसेंजर बोट!

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे मुरबा गणेशभक्तांसाठी पॅसेंजर बोट!

उलवे :  रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत.त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे.त्यामुळे आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे मुरबा गणेशभक्तांसाठी पॅसेंजर बोटीचे जलावतरण शुभांगीताई यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचे झाले असे की,मध्यंतरी मुरबा गणपतीला दर्शनासाठी जाताना होडी कलंडली होती.साहजिकच भक्तांमध्ये भीती होती.ही भीती दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष,महेंद्रशेठ घरत यांनी पॅसेंजर बोटींची इच्छा बोलून दाखवली आणि आज हजारो गणेशभक्तांचे स्वप्न पूर्ण केले.यापूर्वी त्यांनी बसण्यासाठी बाकडेही दिलेले आहेत."गणेशाच्या आदेशानुसार मी काम करतो.त्यामुळेच लोकांची सेवा करण्यात मला आनंद आहे.सेवेचे कार्य मी अखंडपणे करीतच राहणार,असे यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले.यावेळी मुरबा गणपती व्यवस्थापन कमिटीच्यावतीने महेंद्रशेठ आणि शुभांगीताई घरत यांचा सत्कार करण्यात आला.महेंद्रशेठ घरत हे दर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जातातच.त्यांना वेळ असला तर ते थेट मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतात.उलवे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव.येथील मासेमारी करणाऱ्या तीन-चार तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे.त्याचा वर्धापनदिन आज होता.

मुरबा गणपतीचे ते मनोभावे दर्शन घेतात आणि फ्लेमिंगोंचे थवे पाहण्याचा विलक्षण आनंदही घेतात.त्यांनी येथील मुरबा गणपती व्यवस्थापनाला शब्द दिला होता की, मी येथील गणेश भक्तांसाठी आज साधारण सहा लाख रुपयांची पॅसेंजर बोट आणि ८० लाईफ जॅकेट भेट म्हणून देऊन त्यांनी `करून दाखवले’आहे.सध्या मुरबा गणपती मंदिर प्रसिद्ध झाले आहे.पनवेल,ठाणे, भिवंडी, मुरबाड,नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला हजारो गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय आहे.मात्र या होड्या छोट्या आहेत,गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना अबालवृद्धांना, माय-लेकींना धोकादायक असल्याचे महेंद्रशेठ घरत यांच्याही लक्षात आले.त्यामुळे गणेशभक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट द्यायची, असे त्यांनी सौभाग्यवती शुभांगीताई यांना बोलून दाखवले होते.

मी फक्त गणेशभक्त नाही तर सेवक आहे,हे त्यांनी आज त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.अथांग समुद्र,अटल सेतू आणि फ्लेमिंगो यांचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. येत्या काळात मोरावे गावातील तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा,यासाठी महेंद्रशेठ घरत यांचे व्हिजन आहे.यावेळी त्यांचे भाऊ गुलाबशेठ घरत, रमेश घरत,अनंता घरत,किसन घरत व घरत परिवारातील महिला भगिनी तसेच महेंद्रशेठ यांचे सहकारी उत्तम कोळी,सुभाष पाटील, यशवंत ओवळेकर,वैभव पाटील,किरीट पाटील, विनोद म्हात्रे,मुरलीधर ठाकूर,लंकेश ठाकूर,आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे, आदित्य घरत,किरण कुंभार,अरुण म्हात्रे,अंगद ठाकूर,राजेश ठाकूर आणि मोठया संख्येने  ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment