वादळीवारा आणि पावसाच्या धारा....नागरिकांनो घेऊ नका होर्डिंगचा सहारा
पनवेल :- सध्याच्या पावसाळी वातावरणात वादळी वारा पाऊस असेल तर अशा परिस्थितीमध्ये मोठमोठ्या होर्डिंगच्या,जाहिरत फलकाखाली किंवा होर्डिेग जवळ उभे राहू नका,असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरीकांना केले आहे.महानगरपालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी, विविध आकाराचे आणि उंचीचे जाहिरत फलक उभारण्यात आलेले आहेत.अनपेक्षितपणे मान्सुनपूर्ववादळ, वाऱ्यामुळे असे जाहिरात फलक पडू शकतात.
यावर खबरदारीचे उपाय म्हणून महापालिकेने यापूर्वीच सर्व जाहिरातदारांना मान्सुनपूर्व कालावधीत सर्व जाहिरात फलकांची प्रत्यक्ष जागेवर जावून तपासणी करणे, त्याचे फाऊंडेशन व्यवस्थित असल्याचे तसेच जाहिरात फलकांच्या लोखंडी सांगाड्यास गंज लागला नसल्याची खात्री करणे, त्यास गंजरोधक रंग लावणे.एखादा जाहिरात फलक धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तात्काळ निष्कासित करणे,त्यासोबतच जाहिरात फलक वादळवारा यामुळे पडणार नाही,यासाठीच्या सर्व उपाययोजना कराव्यात अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरीकांनी मान्सून कालावधीत अशा जाहिरात फलकाच्या खाली अथवा जाहिरात फलकाच्या आसपास थांबण्याचे टाळावे अथवा आपली वाहने लावू नयेत अथवा टपरी, हातगाडी, पत्राशेड लावून कोणी व्यवसाय करीत असल्यास ते ताबडतोब काढून घ्यावे.जेणेकरुन जीवित अथवा वित्तीय हानी होणार नाही.याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन परवाना विभागाचे उप आयुक्त प्रसेनजित कारलेकर यांनी केले आहे.
.......
Post a Comment