News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कळंबोली वसाहतीमधील विविध समस्यांबाबत आयुक्त मंगेश चितळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश मोहन पाटील यांचे निवेदन

कळंबोली वसाहतीमधील विविध समस्यांबाबत आयुक्त मंगेश चितळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश मोहन पाटील यांचे निवेदन

पनवेल - कळंबोली वसाहतीमधील विविध समस्यांबाबत आयुक्त मंगेश चितळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश मोहन पाटील यांनी निवेदन दिले.

सतीश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात,कलंबोली शहारात मोठ्या प्रमाणात रस्ते गटारे बनविणे काम सुरू आहे ते होत असताना मोठ्या प्रमाणात सुरक्षा दृष्टिकोनातून प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत, तात्पुरत्या स्वरूपात हिरव्या रंगाची नेट ने बांधले जाते पुन्हा परिस्थिती जैसे थे,सध्या शाळा कॉलेज सुरू होणार असून मार्केट, शाळा, धार्मिक स्थळे ज्या ठिकाणी लोकांचा जास्त प्रमाणात वावर आहे अश्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज आहे,पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्वात अत्याधुनिक गार्डन म्हणून सदर गार्डनची नोंद आहे पण ह्या गार्डनकडे उद्यान विभाग यांचे दुर्लक्ष झाले आहे,तरी इतर गार्डनमध्ये जसे विद्युत दिवे पनवेल महानगरपालिका यांनी बसविले आहेत तशाप्रकारे सदर गार्डनमध्ये देखील दिवे बसविण्यात यावे,जेणेकरून नागरिकांना नाहक त्रास होणार नाही व उद्यानाला चकाकी स्वरूप मिळेल,शहरातील KL1, KL2, KL4, KL5, LIG सिडकोच्या जुन्या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी उन्हाळ्यात व पावसाळ्यात देखील अंतर्गत गटारे, 
मलनिस्सारण वाहिनी नेहमी चॉकप (भरत) असतात अनेकवेळा पालिकेची गाडी येवून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती केली जाते.पुनः परिस्थिती जैसे थे,नव्याने बाधण्यात आलेले शहरातील रस्ते हे नियोजित पद्धतीने बांधण्यात येणे अपेक्षित होते.किमान पुढील २० वर्षाचे नियोजन,पण तसे झाले नाही.रस्त्याखालील असणाऱ्या ४० वर्ष जुन्या मल:णिसारण वाहिनी आता बदलण्यात आल्या असत्या तर येणाऱ्या पावसाळ्यात तरी लोकांच्या घरात गटाराचे पाणी जाणार नाही व आरोग्याबाबत समस्या उद्धभवणार नाहीत व 
नागरिकाना दिलासा मिळेल, 

कलंबोली शहारात मोठ्या प्रमाणात रस्ते गटारे बनविणे काम सुरू आहे कलंबोली चर्च समोरील IDBI बँक ते HDFC बँक जवळपास 180 मीटर रुंदीचे गटारांची कामे केली नाहीत त्या यंदाच्या हे काम घेणे अपेक्षित होते पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे ह्या वर्षी देखील पुर- सदृश्य परिस्थिति होणार आहे,हयात तीळमात्र शंका नाही,तरी  विनंती आहे कलंबोली शहरातील पुर सदृश्य हॉटस्पॉट असणारे ठिकाण आयडीबीआय बँक समोरील नाले त्वरित दुरुस्त व नव्याने बांधण्यात यावेत,कलंबोली शहर ज्यावेळी बसविले होते त्यावेळी समुद्र सपाटी पहिलेच खाली बसविले आहे कारमेल शाळा- ते चर्च मागील मुख्यनाला हा धारण तलावाला जोडला आहे ज्या वेळी समुद्राला भरती येते त्यावेळी कलंबोली शहरातील नाल्यानमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहते मागील आठ दिवसांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात सदर ठिकाणी पाणी साचले होते.उन्हाळ्याच्या दिवसात जर अशी परिस्थिति असेल तर पावसाळ्यात खूप भयंकर परिस्थिती निर्माण होईल,शहरात सध्या जे रस्ते नव्याने बनविण्यात येत आहेत त्याची ऊंची मोठी झाली आहे व सोसायटी घरे खाली गेली आहेत,सिडको जुन्या वसाहती KL 1, KL2, KL 4, KL 5, LIG यांना मोठ्या प्रमाणात ह्यावर्षी देखील पुराचा फटका बसणार आहे ,सदर बाब गंभीर असून कलंबोली शहरात २६ जुलै २००५ पुराची पुनरावृती होवू नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

कळंबोली सिंह हॉस्पिटल येथे पनवेल महानगरपालिका यांच्यामार्फत संपूर्ण कळंबोलीतील सेव्हरेज लाईन सक्षम पंप बसविण्यात आलेला आहे,त्याला पूर नियंत्रण कंट्रोल रूम असे नाव देण्यात यावे.सदर पंप ऑपरेटर म्हणजेच कंत्राटदार हे जाणीवपूर्वक मनुष्यबळ व इंधन वाचविण्यासाठी अनेक वेळ बंद ठेवून त्याचा लोकांना नाहक त्रास होत आहे.
तेथील यंत्रणा संपूर्ण ऑनलाइन प्रणाली राबवून 
पारदर्शकता आणण्याबाबत सदर ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावा त्यासाठी एक स्वतंत्र हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात यावा कोविर्ड१९ मध्ये जसे पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ती सर्व माहिती 
उपलब्ध होती तशाच प्रकारे कळंबोली सक्षम पमची भरती ओहोटी सध्याची पाळण्याची पातळीशिवरेज लाईनची आदीबाबत माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात यावे.सदर सक्षन मोटर याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावून किती वेळ चालू ठेवले कधी बंद केलं याचा लॉग रिपोर्ट काढून पर्यवेक्षकांमार्फत दररोज त्याची तपासणी करून यावी.अनेक वेळा त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध नसते.पूर नियंत्रण कंट्रोल रूम असे त्या ठिकाणी नाव देण्यात यावे, अशा स्वरूपात कळंबोलीच्या विविध समस्यांबाबत सतीश पाटील यांनी निवेदन दिले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment