रायगड शेकापतर्फे आज पेझारी येथे शक्तीप्रदर्शन ... पक्षातील प्रमुख नेत्यांनी सोडलेली साथ या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष
पनवेल - रायगड शेकापतर्फे आज अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळ पटांगणावर सायंकाळी ४ वाजता पदाधिकारी निवड मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीतील अपयश आणि त्यानंतर पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी सोडलेली साथ या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे,याशिवाय जुने पदाधिकारी- कार्यकर्त्यांना विश्वासाने सोबत घेऊन पक्ष वाटचाल करणार, त्यामुळे येत्या काळात शेकापमध्ये आमूलाग्र बदल होणार असल्याचे बोलले जात आहे.या आज होणाऱ्या मेळाव्याला शेकापचे चिटणीस जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
Post a Comment