News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नढाळ येथील पंचायतन मंदिराचा ३ रा वर्धापन दिन उत्साहात साजरा .....सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

नढाळ येथील पंचायतन मंदिराचा ३ रा वर्धापन दिन उत्साहात साजरा .....सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पनवेल - पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष श्री.जे.एम.म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर, नढाळ वाडी,चौक तालुका खालापूर या मंदिरांचा भव्यदिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा करून स्थापना करण्यात आली.श्री.मयुरेश्वर गणेश, संकटमोचन श्री.हनुमान, श्री.साईबाबा, श्री.भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या पाच मंदीरांचे "भव्य-दिव्य" असे आध्यात्मिक संकुल उभारण्यात आले आहे.यावर्षी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हरिपाठ,श्रीं ची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा,संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 
याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री.अण्णासाहेब बनसोडे,लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर,खासदार श्री.धैर्यशील पाटील,आमदार श्री.प्रशांत ठाकूर,पनवेल पंचायत समिती मा.सभापती श्री.काशिनाथ पाटील,कृ.ऊ.बा.स.समिती सभापती श्री नारायणशेठ घरत,भाजप रायगड जिल्हाध्यक्ष श्री.अविनाश कोळी,खालापूर मा.नगराध्यक्ष सौ.शिवानी जंगम,शेकाप खालापूर तालुका चिटणीस श्री.संतोष जंगम,नगरसेवक– नगरसेविका,पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  
पायी दिंडी चालत जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी सभागृहात राहण्याची मोफत सेवा देण्यात येते.भक्तांसाठी अत्यल्प दरात भक्त निवासाची व्यवस्था या ठिकाणी आहे.दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत चहा-पाणी ही अन्न सेवा संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते.सांप्रदायिक,भजन कीर्तन कार्यक्रमासाठी मोफत सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.शैक्षणिक सेवेच्या दृष्टीने परिसरातील हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधून अत्यल्पदरात इंग्रजी माध्यमाची शिक्षण सेवा देण्यात येते.शाळेमध्ये पालक नसणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सेवा आणि आवश्यक ते सहकार्य अशाप्रकारे विविध सुविधा श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या परिसरातून देण्यात येतात.
 -- प्रीतम जनार्दन म्हात्रे,
अध्यक्ष,जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment