पनवेल महानगरपालिकेत लोकशाही दिन संपन्न ....नागरिकांच्या तक्रारी,अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवाद
पनवेल : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज रोजी आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन करण्यात आले.नागरिकांच्या तक्रारी,अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवाद वाढीसाठी महापालिकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार आज झालेल्या लोकशाही दिनी नागरी सेवा सुविधा बाबत समस्या सोडविण्यात आल्या.या लोकशाही दिनी दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.मागील लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या 10 ही तक्रारीचे निवारण झाले असून शिल्लक तक्रारींची संख्या निरंक आहे.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे,डॉ.वैभव विधाते,प्रसेनजित कारलेकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे,
सहायक संचालक नगररचना केशव शिंदे,शहर अभियंता संजय कटेकर,मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे ,लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे,आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी,मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.राजू पाटोदकर , सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
. .......
Post a Comment