पहलगाम हल्ल्याचा पनवेल शिवसेनेतर्फे निषेध
पनवेल - जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेचा शिवसेना पनवेल यांच्यावतीने जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कामोठे शहरात निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य लवकरात लवकर सुधारावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
पाकिस्तान मुर्दाबाद,आतंकवाद मुर्दाबाद,आतंकवादीयों सावधान जाग उठा है नौजवान या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.पाकिस्तान ध्वज जाळून घोषणाबाजी करत या दहशतवादी कृत्याबद्दल आपला रोष व्यक्त केला.शिवसेना या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करते.या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.केवळ धर्म विचारून निष्पाप लोकांचे प्राण घेणे हे दहशतवादाचे आणि कट्टरवादाचे अत्यंत निंदनीय स्वरूप आहे.
शिवसेनेच्यावतीने हिंसाचाराचा आणि द्वेषपूर्ण कृत्यांचा कठोर शब्दांत निषेध करण्यात आला.या हत्याकांडातील दोषींचा त्वरित अटक खातमा करावा व काश्मीरमधील निर्दोष नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी, केंद्र सरकारने या घटनेचा गांभीयनि दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल व समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कट्टरपंथी विचारांचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत अशी मागणी रामदास शेवाळे यांनी यावेळी निषेध व्यक्त करताना केली.शिवसेना देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लढत आलेली आहे.शिवसेनेच्यावतीने याप्रसंगी मृत्त झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या निषेध व श्रद्धांजली सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख पनवेल रामदास शेवाळे,कामोठे शहरप्रमुख सुनील भाऊ गोवारी, कळंबोली शहरप्रमुख तुकारामशेठ सरक,खारघर शहरप्रमुख प्रसाद परब,डी.एन. मिश्रा व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment