बसमध्ये अश्लिल चाळे, तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल ...कारवाई करण्यासाठी कामोठे पोलिसांना पत्र
पनवेल (वार्ताहर) ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसमधून प्रवास करणार्या तरुण-तरुणीने बसमधील पाठीमागील सीटवर चक्क अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाजुने जाणार्या दुसर्या बसमधील प्रवाशाने या प्रकाराचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला.त्यानंतर सदर किळसवाणा प्रकार उघडकीस आला.एनएमएमटी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बसमध्ये अश्लिल चाळे करणार्या तरुण-तरुणीवर कारवाई करण्यासाठी कामोठे पोलिसांना पत्र दिले आहे.त्यानुसार कामोठे पोलिसांनी अश्लिल चाळे करणार्या तरुण-तरुणीचा शोध सुरु केला आहे.
’एनएमएमटी’ची मार्ग क्रमांक-73 वरीले एसी बस पनवेल रेल्वे स्थानक ते आयजीपीएल या मार्गावर फेर्या मारत होती. यावेळी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास एनएमएमटी बस पनवेल रेल्वे स्थानकातून आयजीपीएलकडे जाण्यास निघाली होती. या बसमध्ये तुरळक प्रवासी असल्याने ते बसमध्ये पुढील बाजुच्या सिटवर बसले होते.पाठीमागील सीटवर फक्त तरुण-तरुणी बसले होते. बस मधील वाहकाने सर्व प्रवाशांचे तिकीट काढल्यानंतर ते देखील पुढे जाऊन बसले.सदर बस कळंबोली सर्कलच्या अलिकडे सिग्नलवर थांबली होती.याचवेळी पाठीमागील सीटवर कुणीही प्रवासी नसल्याची संधी साधून पाठीमागील सदर तरुणाने त्याच्या सोबत असलेल्या तरुणीचे अर्धवट कपडे काढून बसमध्येच अश्लिल चाळे सुरु केले.सदर प्रकार बाजुने जाणार्या दुसर्या बसमधील प्रवाशाला निदर्शनास आल्याने त्याने आपल्या मोबाईलद्वारे एनएमएमटी बसमध्ये सुरु असलेल्या तरुण-तरुणीच्या अश्लिल चाळ्याचे रेकॉर्डंग केले. त्यानंतर त्याने सदरचा व्हिडीओ व्हायरल केला.व्हायरल झालेला व्हिडीओ एनएमएमटी अधिकारी तसेच नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची एकच तारांबळ उडाली. एनएमएमटी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कामोठे पोलिसांना पत्र पाठवले आहे.तसेच एनएमएमटी बसमधील वायरल झालेल्या व्हिडीओमुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची बदनामी होत असल्याचे पत्रात नमूद केले आहे तसेच या प्रकाराची दखल घेऊन बसमध्ये अश्लिल चाळे करणार्या तरुण-तरुणीवर कारवाई करण्यात यावी,अशी विनंती केली आहे.बसमध्ये अश्लिल चाळे करणार्या सदर तरुण-तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली तसेच या तरुण-तरुणींचा शोध घेण्यात येत असल्याचेही बिडवे यांनी सांगितले.
Post a Comment