दोन ट्रेलरच्या अपघातात एक जण जखमी ... कसळखंड गावाच्या हद्दीतील घटना
पनवेल (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कसळखंड गावाच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर झालेल्या दोन ट्रेलरच्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.ट्रेलर क्रमांक जीजे02-सीडब्ल्यू-9703 यावरील चालक अभिषेक सिंग (वय 25 राहणार युपी) हे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गा वरून पुणे ते बडोदा असे जात असताना कि.मी. 11/200 या ठिकाणी आले असता आपल्या ताब्यातील वाहन शोल्डर लेनला थांबून लघुशंकेसाठी थांबले असता पाठीमागून येणारा ट्रेलर क्रमांक एनएल01-एल-6914 वरील चालक हरपुल नानू राम गुजर (वय 35 राहणार राजस्थान) यांना झोपेची डुलकी लागल्याने समोरील ट्रेलरला पाठीमागून उजव्या साईटला जोरदार धडक देऊन किरकोळ दुखापत अपघात घडलेला आहे. सदर अपघातात चालक हरफुल गुजर यांचे डावे पायाला किरकोळ दुखापत झालेली आहे.
Post a Comment