News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नैना प्रकल्पाविषयी मुंबईत महत्वपूर्ण बैठक ....आ.विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिडको प्रशासनाशी चर्चा ..... महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीतही बैठक

नैना प्रकल्पाविषयी मुंबईत महत्वपूर्ण बैठक ....आ.विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिडको प्रशासनाशी चर्चा ..... महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीतही बैठक

पनवेल - आ.विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या नैना प्रकल्पासंदर्भात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिडको प्रशासनाशी चर्चा केली,त्याचप्रमाणे नैना प्रभावित क्षेत्रातील बांधकाम नियमित करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण  बैठक घेण्यात आली.

आ.विक्रांत पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती,त्यानुसार पनवेल-उरणमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रशासनाची एक महत्वपूर्ण बैठक सिडको निर्मल भवन,मुंबई येथे संपन्न झाली.

या बैठकी दरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या बाधित घरांना नियमित करणे,शेतकऱ्यांच्या मूळ घरावर आरेखित केले गेलेले इतर शेतकऱ्यांचे ४०% प्लॉट तथा शेतकऱ्यांच्या घरांवर टाकली गेलेली गार्डन, ओपन स्पेसेस व इतर आरक्षणे याबाबत आरक्षण इतरत्र हलवण्यासंदर्भात बदल करून तातडीने निर्णय करणे,गावठाण लगतच्या बांधकामांना नियमित करण्यासाठी UDCPR मधील कनजेस्टेड एरिया साठीच्या तरतूदी लागू करणे, पुनर्विकासाकरिता वाढीव FSI देणे, रस्त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधकामांना योग्य मोबदला, पुनर्वसन या बाबत सकारात्मक निर्णय करणे, शेतकरी व ग्रामस्थानची योग्य पध्दतीने संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करणे व अडचणी दूर करणे.या सर्व व इतर अति महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
सिडको प्रशासनाने प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंत्री महोदयांसमोर सकारात्मक भूमिका घेतली.येणाऱ्या कालावधीमध्ये हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न व पाठपुरावा करण्यासाठी आम्ही काटीबद्ध असल्याचे आ.विक्रांत पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस माजी कोकण म्हाडा सभापती श्री.बाळासाहेब पाटील,सिडको व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंगल, JMD शंतनू जी गोयल,JMD गणेश देशमुख,मुख्य लँड सर्वे ऑफिसर समाधान खटकाळे, मुख्य नियोजन अधिकारी श्री. मानकर,अतिरिक्त नियोजन अधिकारी डॉ प्रिया,मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक डॉ.प्रशांत रसाळ यांच्यासह  सिडकोचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment