News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांनी केला काळा दिवस म्हणून साजरा.... पनवेलमध्ये निदर्शने

सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांनी केला काळा दिवस म्हणून साजरा.... पनवेलमध्ये निदर्शने

पनवेल - सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांनी केला काळा दिवस म्हणून साजरा केला आणि याचा निषेध म्हणून पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शने आज केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१७ मार्च  १९७० साली सिडकोची स्थापना झाली.स्थापनेला ५५ वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत,त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी १७ आज प्रकल्पग्रस्त संघटनेने सिडकोचा स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केला.सिडको शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. दरवर्षी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई,उरण,पनवेल परिसरातील तब्बल साडेतीन लाख हेक्टर शेत जमीन नष्ट करण्यात आली आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका अशा दोन स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील सिडकोचा काय काम असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारत आहेत.दरवर्षी १७ मार्च  हा काळा दिवस पाळून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करत आहेत.प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे,नैना प्रकल्प हटवणे,विरार- अलिबाग कॉरिडॉरमध्ये विस्थापित होणाऱ्या गावांच्या समस्या,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संपादित जमिनीबाबत योग्य निर्णय, अशा एक ना अनेक मागण्या या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी देखील मागणी करण्यात येत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment