News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलकरांना मिळणार २५ खाटांचे पूर्णपणे मोफत डायलिसिस सेंटर! खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची घोषणा ... खासदार-शिवसेना-महानगरपालिका बैठक

पनवेलकरांना मिळणार २५ खाटांचे पूर्णपणे मोफत डायलिसिस सेंटर! खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची घोषणा ... खासदार-शिवसेना-महानगरपालिका बैठक

पनवेल - पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख ॲड.प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहून पनवेल पालिकेच्या विविध लोकाभिमुख योजना व सामाजिक प्रश्नांचा संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे व सर्व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.यावेळेस पनवेल महापालिकेला २५ खाटांचे डायलिसिस सेंटर पूर्णतः उभारून देण्याचे वचन दिले,यामुळे पनवेलमधील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

त्याचप्रमाणे आयुक्त मंगेश चितळे यांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी केलेल्या विविध योजनांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. बाळगंगा धरणातून वाढीव पाणीपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचेही आप्पा बारणे यांनी सांगितले. मालमत्ता कराच्या शास्तीबाबतही यावेळेस पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पनवेलकरांची शास्ती पूर्णपणे माफ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आप्पा बारणे म्हणाले. व या विषयात सातत्याने पाठपुरावा करणारे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण व महानगर संघटक मंगेश रानावडे यांचे विशेष कौतुक केले. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून पनवेल महापालिकेला देण्यात आलेल्या सॅनिटरी पॅडच्या वेंडिंग मशीनचे ही लोकार्पण केले व पनवेल पॅटर्न म्हणून अधिकाधिक खासदार निधी देऊन हा उपक्रम आणखीन मोठ्या पद्धतीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी काही नागरिक व पक्षाचे विविध पदाधिकारी यांनी मांडलेल्या विविध समस्यांचाही परामर्श घेण्यात आला.

या ठिकाणी पनवेल महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण,उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, संपर्कप्रमुख राजेंद्र यादव महिला जिल्हा संघटिका रीना पाटील,उपमहानगर प्रमुख महेश सावंत,सचिन मोरे,महानगर संघटक मंगेश रानावडे ,महिला तालुका संघटिका मंदा जंगले,खारघर शहर प्रमुख प्रसाद परब,कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी,पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, नवीन पनवेल शहरप्रमुख अतुल मोकल,पनवेल शहर संघटक अभिजीत साखरे, प्रसिद्धीप्रमुख तोफिक बागवान, ज्येष्ठ शिवसैनिक मल्लिनाथ गायकवाड, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, सुजन मुसलोंडकर, खंडेश धनावडे,नवीन पनवेल महिला शहर प्रमुख माया देवडे पनवेल शहर संघटिका अर्चना जाधव ,कळंबोली महिला संघटिका ज्योती पाटील, महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते,श्री गावडे,अतिरिक्त आयुक्त भरत राठोड, स्वप्नाली चौधरी इत्यादी अधिकारी यासह इतर शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment